शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

एन्झोकेम विद्यालयाचा ९८ टक्के निकाल

By admin | Updated: June 1, 2017 01:00 IST

येवला : येथील एन्झोकेम विद्यालयाचा विज्ञान शाखेचा शेकडा निकाल शेकडा ९८ टक्के लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येथील एन्झोकेम विद्यालयाचा विज्ञान शाखेचा शेकडा निकाल शेकडा ९८ टक्के लागला. विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मयूरी सुनील धनवटे हिने ८८ टक्के गुण मिळवत येवला केंद्र क्र मांक २१३ मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. उमेर मोहम्मद अन्सारी याने ८७.५३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर ऋषील राजेश पटेल याने ८१.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक प्राप्त केला व आकांक्षा अविनाश कुलकर्णी हिने ८० टक्के गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल शेकडा ९८.०३ टक्के लागला. कु. अनिता नानासाहेब जाधव ७६.३० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम मिळविला आहे. कु. कल्याणी संजय फाळके हिने ७४.६१ टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कु. जयश्री प्रकाश साळवे हिने ७४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेचा शेकडा निकाल ८१ टक्के लागला. कु. आरती दिनकर कोटमे हिने ८०.६१ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राहुल सोपान खोकले याने ७५.९६ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. दीपाली सुधाकर येवले हिने ७०.६१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष सुरेश गुजराथी, सेक्रेटरी सुशीलकुमार गुजराथी, सहसेक्रेटरी चिरायू पटेल, प्राचार्य रमेश जाधव, उपप्राचार्य रामदास काहार, पर्यवेक्षक डी.जी. महाले यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा कला शाखेचा शेकडा निकाल ९०.६४ टक्के लागला असून, महेश माणिक कोल्हे याने ७९.३३ टक्के गुण मिळवून नगरसूल केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. सीमा संजय गाडे हिने ७७.९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्र मांक मिळवला, तर कु. पूजा भारत इप्पर हिने ७७.३० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. एचएससी व्होकेशनल विषयांतर्गत कु. धनश्री अंबादास बारे हिने ७७.२३ टक्के गुण मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. कु. माधुरी नवनाथ सेंद्र ७४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. अश्विनी संजय पवार ७२.६१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रमोद पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, प्राचार्य एस.पी. नागरे, उपप्राचार्य एन.बी. गायकवाड, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे यांनी अभिनंदन केले.