शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निफाड लोकन्यायालयात ९७१ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 18:24 IST

निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ९७१ प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन ३१लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची वसुली झाली आहे.

ठळक मुद्दे३१ लाख ४८ हजार रक्कमेची वसुली

लासलगाव: निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात ९७१ प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन ३१लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची वसुली झालीआहे.न्यायालयात दाखल व वादपुर्व प्रकरणांत लोकन्यायालयात समजुतीने तोडगा काढण्यासाठी रविवारी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निफाड न्यायालयात समन्वयासाठी निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश १ आर जी वाघमारे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती एम एस कोचर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी एन गोसावी या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन समित्यांद्वारे कामकाजास प्रारंभ करण्यात आला. समित्यांवर सदस्य म्हणुन अ‍ॅड संजय दरेकर, सुनिल शेजवळ, अरविंद बडवर, भावना चोरिडया नानासाहेब केदार, आर. बि. गायकवाड आदी वकिलांचा समावेश करण्यातआला होता.या लोकन्यायालयात न्यायप्रविष्ट फौजदारी १४२ प्रकरणांपैकी २५ तर दिवाणी ८४ प्रकरणांपैकी ३५ असे एकुण६० प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली यातुन १३ लाख ६३ हजार ३२५ रु पयांची वसुली होऊन निकाली झाली तर न्यायालयात दाखलपुर्व विज वितरण कंपनीचे ग्रामपंचायत बँका पतसंस्थाचे १०९१९ प्रकरणांपैकी ९११ प्रकरणे निकाली समन्वयाने निकाली निघाली असुन त्यातुन १७ लाख ८५हजार ७५रु पयांची वसुली झाली आहे.निफाड न्यायालयातील न्यायप्रविष्ट व वादपुर्व मिळुन ९७१ प्रकरणे निकाली निघाली त्याद्वारे एकुण ३१ लाख ४८ हजार ४०० इतक्या रक्कमेची प्रकरणे आपसात समन्वयाने मिटली आहेत.लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विधी सेवा समितिचे एस एम पवार अधीक्षक अनंत काशिकर सहा अधिक्षक एम एस कुलकर्णी एस पि शेलार गोकुळ शेळके, सि एस भानुवंशे दत्ता दळवी, एन .डि. कोथमिरे , वाय एस कुलकर्णी, आर एच नावाडकर ,एस एस सोनवणे , सुनिल नाईक, एस पि नेवगे, सोमनाथ बारे, श्रीमती मांजरे आदी न्यायालयीन कर्मचारी प्रयत्नशील होते.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय