शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसह विभागात ९४५ पदे रिक्त : शिक्षण समिती बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 19:33 IST

नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी नसल्याने या शाळाखोल्यांचे काम रखडल्याचेही बैठकीत समोर आले.शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या अध्यक्षतेखाली ...

नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी नसल्याने या शाळाखोल्यांचे काम रखडल्याचेही बैठकीत समोर आले.शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक बैठक झाली. बैठकीत रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला असता, त्यात ९४५ जागा रिक्त असल्याचे आढाव्यात उघड झाले. पाठ्यपुस्तक व शालेय गणवेशाची माहिती घेण्यात आली. त्यात ९० टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाच्या रक्कमेचे वाटप झाले आहे. परंतु काही ठिकाणी बॅँकांच्या अडचणींमुळे अनुदान वितरीत करणे अडचणीचे झालेले आहे. या अडचणी तत्काळ दूर करून १०० टक्के गणवेश वाटप करून अनुदानदेखील १०० टक्के वितरीत करण्याबाबत सभापती यतिन पगार यांनी दिल्या. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १७० शाळाखोल्यांचे बांधकाम सुरू आहे, तर २२६ शाळा खोल्या मंजूर असून, त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने त्यांचे बांधकाम रखडल्याचे बैठकीत उघड झाले. निर्लेखन प्रस्तावांमधील त्रुटी दूर करून मुख्याध्यापकांनी प्रस्ताव मान्यतेसाठी तत्काळ सादर करावेत, अशा सूचना यतिन पगार यांनी दिल्या. शालेय पोषण आहाराच्या रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने बचतगटांचे मानधन देणे बाकी होते. त्या बचतगटांना राष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये खाते उघडण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नव्याने ९२ शाळा बांधकामांचे निर्लेखनाचे प्रस्ताव बांधकाम विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.