शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पहिला डोस घेणाऱ्यांचे नाशिक शहरात ९२ टक्के प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 01:45 IST

ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी गर्दी होत असून त्यामुळेच महापालिकेने चार ठिकाणी चोवीस तास लसीकरणाची देखील व्यवस्था केली आहे.

ठळक मुद्देप्रतिसाद आटला: दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ६२ टक्के
नाशिक- ओमायक्रॉनच्या पाश्व'भूमीवर प्रशासनाकडून लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असून पहिला डाेस घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढत जाऊन तब्बल ९२ टक्यांवर पोहोचले आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही ६२ टक्के इतके झाले आहे. सध्या पहिल्या पेक्षा दुसऱ्या डोस साठी गर्दी होत असून त्यामुळेच महापालिकेने चार ठिकाणी चोवीस तास लसीकरणाची देखील व्यवस्था केली आहे.जानेवारी महिन्यात केारेाना प्रतिबंधक लसीकरण उपलब्ध झाल्यानंतर सुरूवातीला केारोना योध्दे आणि फ्रंड लाईन वर्कर्स यांनाच ती देण्यात आली. ४५ वर्षावरील आणि तेही व्याधीग्रस्त नागरीकांना लस देण्याचे सुरवातीला ठरवण्यात आले. त्यानंतर आता १८ वर्षावरील सर्वांनाच लस दिली जात आहे. कोरेानाच्या दुसऱ्या लाटेनंतर नागरीकांनी रांगा लाऊन डाेस घेण्याची तयारी केेली मात्र, डोसच उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत हेाती. ऑक्टोबरच्या सुमारास मुबलक डोस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाला प्रतिसाद वाढला. त्यानंतर आता बऱ्यापैकी निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा कोरोना संकट ओढोवणार नाही अशा आर्विभार्वत नागरीक असले तरी ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा लसीकरणाला प्रतिसाद वाढला. पुन्हा एकदा रांगा लावून लसीकरण करून घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने लसीकरण वाढवण्यासाठी जेारदार मोहिम सुरू असून ९२ टक्के नागरीकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ६२ टक्के नागरीकांनी दुसरा डोस घेतला आहे.सध्या नाशिक शहरात १३५ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था असून पहिल्या डोस पेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पहिला डाेस जेमतेम एक हजार नागरीकांना दिला जात असून पाच ते सहा हजार नागरीकांना रोज दुसरा डोस दिला जात आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.इन्फो...असे आहे लसीकरण...पहिला डोस- ९,९५,७०९दुसरा डोस- ७,०१,२१२एकुण- १६, ९६,९२१
टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस