शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरहून ९०४ कामगारांची बिहारला घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:26 IST

सिन्नर : लॉकडाउनमुळे रोजगार हिरवल्यामुळे माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून तब्बल ९०४ बिहारी कामगारांनी बुधवारी सिन्नरला अलविदा केले. सिन्नर तहसीलकडून १९ बसच्या माध्यमातून या बिहारी कामगारांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. दुपारी २ वाजता विषेश रेल्वेने हे परप्रांतीय बिहारकडे रवाना झाले.

सिन्नर : लॉकडाउनमुळे रोजगार हिरवल्यामुळे माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून तब्बल ९०४ बिहारी कामगारांनी बुधवारी सिन्नरला अलविदा केले. सिन्नर तहसीलकडून १९ बसच्या माध्यमातून या बिहारी कामगारांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. दुपारी २ वाजता विषेश रेल्वेने हे परप्रांतीय बिहारकडे रवाना झाले.गावाकडे परतण्यासाठी या मजुरांची यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात आली होती. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यांना १९ बसच्या माध्यमातून नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात आले. पाणी, बिस्कीट पुडे, जेवणाचे पॉकेट देऊन या कामगारांची रवानगी करण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, डॉ. मोहन बच्छाव, संजय गाडे, माणिक गाडे, आकाश हांडे, स्वरूप गोराणे उपस्थित होते.-----------------------------परप्रांतीयांनी सोडले सिन्नर४यापूर्वी मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून उत्तर प्रदेश येथे विशेष रेल्वेने १४८८, मध्य प्रदेशात ५३९ आणि आता बिहार येथे ९०४ अशा एकूण २९३१ परप्रांतीयांची त्यांच्या मुळगावी सुरक्षित पाठवणी केली. प्रशासनाच्या दप्तरी तीन हजार कामगारांची नोंद झाली असली तरी अनेकांनी नोंदणी न करताच आपापल्या परीने मुळगाव गाठले आहे. त्यामुळे सिन्नरमधून सुमारे चार हजार परप्रांतीय गावाकडे परतल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक