शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचे १९ कोटी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:12 IST

जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेली आर्थिक तरतूद खर्ची पाडण्यास समाज कल्याण, बांधकाम खाते अपयशी ठरल्याचे वाभाडे निघत असताना त्यात आता आरोग्य विभागाचीही भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आलेल्या एकूण निधीतून १९ कोटी ५ लाखाचा निधी जानेवारीपर्यंत खर्च झालेला नसल्याचे विभागाच्या आढावा बैठकीत समोर आले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मार्चअखेरचा ‘अल्टिमेटम’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेली आर्थिक तरतूद खर्ची पाडण्यास समाज कल्याण, बांधकाम खाते अपयशी ठरल्याचे वाभाडे निघत असताना त्यात आता आरोग्य विभागाचीही भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आलेल्या एकूण निधीतून १९ कोटी ५ लाखाचा निधी जानेवारीपर्यंत खर्च झालेला नसल्याचे विभागाच्या आढावा बैठकीत समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची मासिक बैठक घेण्यात आली. त्यात योजनानिहाय आढावा घेतानाच मिशन ‘इंद्रधनुष्य’ लसीकरण मोहिमेचीही माहिती जाणून घेण्यात आली. निधी खर्चाबाबत आरोग्य विभागाने १९ कोटी ५ लाख, ८४ हजार रुपयांचा निधी जानेवारी महिन्यापर्यंत अखर्चित असून, त्यातही बहुतांशी निधी हा बांधकाम विभागासाठी तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सदरचा निधी ३१ मार्चअखेर खर्च न झाल्यास तो शासनास परत करावा लागणार असल्याची बाब सभेत समोर आल्याने सर्वच सदस्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. निधी परत गेल्यास दायित्व जास्त प्रमाणात रहून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या नियोजनास वाव शिल्लक राहणार नसल्याने जिल्हा परिषदेचा निधी कमी होऊन आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील जनता आरोग्य सेवेपासून वंचित राहण्याची भीती सदस्यांनी बोलून दाखविली. त्यामुळे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील प्राप्त निधी ३१ मार्च २०२० पर्यंत खर्च न झाल्यास संबंधितांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना सभापती दराडे यांनी तंबी दिली. या बैठकीस यशवंत ढिकले, हरिदास लोहकरे, यशवंत गवळी यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद