शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

९ रिश्टरचा भुकंप पचवू शकते संसदेची नवीन वास्तू

By अझहर शेख | Updated: June 22, 2023 14:15 IST

बांधकामात योगदान देणारे टाटाचे अभियंता संदीप नवलखे यांनी उलगडला पट

अझहर शेख, नाशिक : भारतीय संसदेच्या नवीन वास्तूच्या निर्मिती करताना भुकंपाचा पाचवा झोनची तीव्रता लक्षात घेण्यात आली आहे. यानुसार भुकंपरोधक यंत्रणा विकसित करत बांधकाम करण्यात आले. अत्यंत उच्च प्रतीचा स्टील जो बाजारात उपलब्ध होत नाही, तो या वास्तूच्या बांधकामात वापरला गेला आहे. यामुळे सुमारे ९ रिश्टर स्केलचा धक्कादेखील ही पर्यावरणपूरक आणि प्लॅटिनम-रेटेड ग्रीन वास्तू पचवू शकते, असा विश्वास संसदेची वास्तु उभारणी करणारे टाटा प्रकल्पाचे कार्यकारी उपाध्यक्ष अभियंता संदीप नवलखे यांनी व्यक्त केला.

गंगापुररोडवरील के.बी.टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे फायर सिक्युरिटी असो.ऑफ इंडियाच्या (एफएसएआय) वतीने ‘नवीन संसदेचे बांधकाम : एक अभियांत्रिकी दृष्टीकोन’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.२१) करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, नवीन संसदेची वास्तू उभारणी आव्हानात्मक होती. दिल्ली शहराचा समावेश हा भुकंपाच्या ४थ्या झोनमध्ये होतो; मात्र तरीही पाचव्या झोनमधील तीव्रता विचारात घेत भुकंपरोधक बांधकाम करण्यात आले आहे. या वास्तूचे आर्युमान साधारणत: दीडशे वर्षे इतके सहज आहे, असा दावाही नवलखे यांनी यावेळी केला. संसद भवनात भारतातील प्रचलित असलेल्या लोकप्रिय स्थापत्य शैलींची संस्कृती आणि शिल्पकला प्रदर्शित करण्यात आली आहे. देशाची सर्वोच्च वास्तू उभारणीत योगदान दिल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी एफएसएआय नाशिकचे अध्यक्ष वरुण तीवारी, सचिव हर्षद भामरे उपस्थित होते.

एक भारत श्रेष्ठ भारत...

संसदेची नवीन वास्तू उभारणी करताना ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ यानुसार कामांची विभागणी करण्यात आली आहे. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग हवा या हेतूने देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागविण्यात आले आहे. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव कामापर्यंत प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपुर्ण व वैविध्यपुर्ण असल्याचे नवलखे यांनी सांगितले.

कुठल्या शहरातून काय आणले...

  • मुंबई- फर्निचर उभारणी
  • त्रिपुरा- बांबू
  • उत्तरप्रदेश- गालिचे
  • सरमथुरा- लाल-पांढरे वाळुुंचे दगड,
  • उदयपूर- केशरी- हिरवा दगड, र्
  • लाखा (अजमेर)- लाल ग्रेनाईट,
  • अंबाजी- पांढरे संगमरवर दगड
  • इंदुर- अशोक चक्र
  • नागपुर- उच्च प्रतीचा साग लाकूड

खर्च - १ हजार कोटी

  • २६,०४५ मेट्रिक टन स्टीलचा वापर
  • ६३,८०७ मेट्रिक टन सिमेंटचा वापर
  • ९६८९ घनमीटर फ्लाय अॅशचा वापर
टॅग्स :NashikनाशिकParliamentसंसद