शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

९८ टक्केच काम पूर्ण : डिसेंबरअखेर मुक्ती अवकाळी पावसाचा खड्डेमुक्तीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:56 IST

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्ती अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले

ठळक मुद्देडिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यताराज्य खड्डेमुक्त करण्याचे जाहीर

नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्ती अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले असले तरी, नाशिक जिल्ह्यामध्ये आणखी दोन टक्के काम अपूर्ण असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी व्यक्त केली आहे. राज्यात पावसाळ्यात प्रमुख राज्य महामार्ग व जिल्हा मार्गाच्या दुरवस्थेवरून विरोधी पक्षांनी व विशेषत: राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘खड्डे विथ सेल्फी’ अभियान राबवून राज्य सरकारला जेरीस आणले होते. खराब रस्त्यांमुळे होणाºया लहान-मोठ्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने शासनाने खड्डे बुजवावेत, अशी मागणीही जोर धरू लागली होती. त्यातूनच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्य खड्डेमुक्त करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रमुख राज्यमार्ग व जिल्हामार्गावरील खड्ड्यांची माहिती मागविली होती.अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच कामया खड्डेमुक्ती अभियानात फक्त खड्डे बुजविण्याचेच काम हाती घेण्यात आले आहे, मात्र ज्या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ आहे त्या मार्गावरील डांबर निघालेले असेल तर ते या अभियानात दुरुस्त करणे अपेक्षित नाही, त्यासाठी नवीन रस्त्याचे बळकटीकरण हेच गृहीत धरण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता आर. आर. हांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नाशिक जिल्ह्यातून जाणाºया राज्यमार्गाची लांबी १६८० किलोमीटर इतकी असून, प्रमुख जिल्हा मार्ग २५०० किलोमीटरचा आहे. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार सुमारे ३५ कोटी रुपये खड्डे बुजविण्यासाठी खर्च होणार आहे. याकामी ठेकेदाराची नेमणूक करून राज्यमार्गाचे १६६० किलोमीटरचे व प्रमुख जिल्हामार्गाचे २२५२ किलोमीटर अंतरातील खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच ज्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास तो वर्षभरात बुजविण्याची जबाबदारी ठेकेदारावर निश्चित करण्यात आली आहे.