शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार

By श्याम बागुल | Updated: March 13, 2021 00:57 IST

गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१  वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे स्थलांतर : नवीन खोल्या बांधण्यासाठी निधीची कमतरता

नाशिक : गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१  वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या असल्या तरी, काही खोल्या पाडण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी नसल्याने त्या तशाच असून, ज्या ठिकाणी खोल्या पाडण्यात आल्या, तेथील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे सर्वप्रथम पसरविण्यात आले. त्यासाठी काही गावांमध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेत शाळांसाठी जागा व लोकवर्गणीतून खोल्यांचे बांधकाम तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी करून दिले आहे. त्यानंतर शासनाकडूनही ज्ञानाची गंगा आणखी बळकट करण्यासाठी शाळा खोल्यांचे बांधकाम करून देण्यात आले. अशा शाळांमधून आजवर हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. मात्र, आता देखभाल व दुरूस्तीअभावी खोल्यांची परवडच होत आली आहे. शासनाकडून अन्य शैक्षणिक बाबींवर वारेमाप खर्च केला जातो. मात्र, शाळांची दुरूस्ती वा नवीन शाळांच्या बांधकामाबाबत हात अखडता घेतला जात असल्याने वर्षानुवर्षे वादळी वारा, तडाख्याच्या पावसाचा सामना करणाऱ्या ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था कायम आहे. अनेक शाळांची पडझड झाल्याने अशा वर्गांमध्ये विद्यार्जन करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्याकडून धोकादायक वर्गखोल्यांची माहिती मागविली असता २९६ प्राथमिक शाळांच्या सुमारे ८८१ वर्गखोल्या धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार त्या निर्लेखीत करण्यात येणार आहेत. या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाची कोणतीही तजवीज शिक्षण विभागाकडून केली जात नसल्याने धोकादायक वर्गखोल्या जैसे थे आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तूर्त या वर्गखोल्या पाडण्याची शिक्षण विभागाला घाई नसली तरी, पावसाळ्यात या शाळा कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा