शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:45 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : म्हाळुंगी नदी प्रवाहित

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने ठाणगावजवळील उंबरदरी धरण १५ आॅगस्ट रोजी भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुमारे महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्याने भोजापूर धरणात १७ जुलैपर्यंत ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १६ आॅगस्टपासून पश्चिम पट्ट्यात पावसाचा पुन्हा जोर वाढल्यामुळे म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात पुन्हा एकदा १७ आॅगस्टपासून नवीन पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. अवघ्या पाच दिवसात धरणात २०० दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. त्यामुळे ३६१ क्षमतेच्या भोजापूर धरणात बुधवारी (दि. २२) सकाळपर्यंत ३०४ दशलक्ष घनफूट पाणी म्हणजे ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.यावर्षी उन्हाळ्यात भोजापूर धरणात फक्त मृत पाणीसाठा शिल्लक होता. तुरळक झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील काही भागात पेरण्या केल्या आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिना झाला आहे. परंतु अद्यापही पावसाने चांगल्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही.नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागणारगतवर्षी भोजापूर धरण २५ जुलै रोजी भरले होते. तब्बल तीन महिने पूरपाणी लाभक्षेत्रात व परिसरात सुरू होते. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह पाच गावे नळपाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून, यावर्षी तब्बल एक महिना उशिराने धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी अपेक्षा लाभ क्षेत्रातील शेतक री करत आहे.