शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

८३ तीव्र तर २५० मध्यम कुपोषित बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:19 IST

त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार पर्यवेक्षिकांचे दुर्लक्ष

वसंत तिवडे ।त्र्यंबकेश्वर : अंगणवाड्यांच्या दिशाहीन कारभारामुळे व पर्यवेक्षिकांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात कुपोषितांचे प्रमाण वाढत असून, असाच कारभार सुरू राहिला तर त्र्यंबक तालुक्याचे पालघर झाल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात वाढीस लागलेल्या कुपोषणाला आळा घालण्यात व त्यावर काम करणाऱ्या यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही.तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० असल्याने शासन यंत्रणा त्या सोबत या यंत्रणेतील प्रमुख घटक अंगणवाडी याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे तालुक्यातील सरसकट चित्र आहे.तालुक्यात आयसीडीसीचे दोन प्रकल्प आहेत. त्र्यंबकेश्वर व हरसूल प्रकल्पात तीव्र कपोषित बालके ४३, तर मध्यम कुपोषित १२१ व हरसूल प्रकल्पात तीव्र कुपोषित ४०, तर मध्यम कुपोषित १२९ बालके आहेत. म्हणजेच तालुक्यात तीव्र कुपोषित बालके ८३, तर मध्यम कुपोषित बालके २५० आहेत. अर्थात प्रत्येक महिन्याला हे प्रमाण कमी अधिक होत असते हा भाग वेगळा !आदिवासी भागात व पेसा कायदा लागू असलेल्या अंगणवाड्या कधी चालू तर कधी बंद असल्याने बालके व गरोदर माता तसेच स्तनदा माता यांना पोषण आहार वेळेवर मिळत नसेल तर पोषण आहाराअभावी त्यांची वजने कमी होतील नाही तर काय होणार? पुरेसा आहार मिळत नसल्याने आहाराअभावी कमी वजनाच्या बालकांचे जन्माला येण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कुपोषणाच्या या गंभीर प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहता तालुक्यात अनेक ठिकाणी योजना फक्त कागदावरच व कम्प्युटर डाटामध्ये दिसूनयेतो. शासनाची प्रभावी अंमलबजावणी रखडलीतालुक्यात अंगणवाड्या वेळेवर न उघडणे, बालकांचा पोषण आहार कागदोपत्री दाखविणे व प्रत्यक्षात कमी प्रमाणात देणे तसेच अमृत आहाराचे नियोजनदेखील ढासळलेले दिसते. कारण आज दिला तर उद्या नाही अशा परिस्थितीवरून अंगणवाड्यांचा दिशाहीन कारभार व पर्यवेक्षिकांच्या कारभाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. कुपोषण निवारणाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी रखडल्याचे चिन्ह दिसत आहे. शासनाने आदिवासी भागात अमृत आहार योजना चालू केली. मात्र असंवेदनशील सुस्त यंत्रणा कागदोपत्री आहार देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.