शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८१६ नाशिककरांचे ड्रायव्हिंग ९० दिवसांसाठी झाले ‘बॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 00:56 IST

वाहन चालविताना सर्रासपणे मोबाइलवर बोलणे असो किंवा सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन असो, हे चित्र शहरात दररोज पहावयास मिळते; मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांकडून आता केवळ दंडच वसूल केला जाईल असे नाही, तर तीन महिन्यांसाठी थेट वाहन चालविण्याचे लायसन्सदेखील रद्द केले जाऊ शकते. मागील दोन वर्षभरात तब्बल ८१६ बेशिस्त वाहनचालकांचे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रद्द केले आहेत.

ठळक मुद्दे‘आरटीओ’चा दणका : वाहन चालविताना मोबाइलचा वापर, सिग्नलचे उल्लंघन, मद्यप्राशन भोवले

नाशिक : वाहन चालविताना सर्रासपणे मोबाइलवर बोलणे असो किंवा सर्रासपणे सिग्नलचे उल्लंघन असो, हे चित्र शहरात दररोज पहावयास मिळते; मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांकडून आता केवळ दंडच वसूल केला जाईल असे नाही, तर तीन महिन्यांसाठी थेट वाहन चालविण्याचे लायसन्सदेखील रद्द केले जाऊ शकते. मागील दोन वर्षभरात तब्बल ८१६ बेशिस्त वाहनचालकांचे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रद्द केले आहेत.नाशिक शहर व परिसरात बेशिस्त वाहतुकीचा कळस दररोज नजरेस पडतो. दुचाकीचालक, चारचाकीचालक सर्रासपणे लहान-मोठ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. एक जागरुक नाशिककर म्हणून रस्त्यांवरुन वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांपेक्षा वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या समितीने (सीओआरएस) याबाबत सूचना केली. या सूचना विचारात घेता राज्य शासनाने मोटार वाहन कायदा, १९८८ कलम-१९ अंतर्गत व केंद्रीय मोटार वाहन नियम,१९८९ च्या नियम-२१ नुसार वाहतूक नियमांच्या सहा गुन्ह्यांसाठी आरटीओने दिलेला वाहन परवाना थेट ९० दिवसांकरिता रद्द करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.यामुळे आता यापुढे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदरकारपणे वाहने दामटविणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, सिग्नलचे पालन न करणे, मालवाहू वाहनातून सर्रासपणे प्रवाशांची वाहतूक करणे, मद्य प्राशन करुन वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे असे कृत्य करताना कोणी वाहनचालक आढळून आल्यास थेट त्याचा वाहन परवाना यापुढे रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....तर परवाना कायमस्वरूपी निलंबितवरील सहा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित पोलीस ठाणे, वाहतूक शाखा अथवा आरटीओ अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या परवाना निलंबित करण्याच्या प्रस्तावाची चौकशी करत पहिल्यांदा गुन्ह्यात आढळल्यास ९० दिवसांकरिता परवाना रद्द करण्यात येतो; मात्र त्यानंतरही अशा प्रकारे गुन्ह्याची पुनरावृत्ती संबंधित वाहन चालकांकडून झाल्यास त्याचा परवाना कायमस्वरुपी निलंबित केला जाऊ शकतो.अशी झाली कारवाईn    १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत ६९८ वाहन चालकांचे परवाने रद्दn    १एप्रिल २०२० ते ३१ डिसें.२०२० या कालावधीत ११८ वाहनचालकांचे परवाने रद्द

टॅग्स :NashikनाशिकRto officeआरटीओ ऑफीस