शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने  ८ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:59 IST

बेरोजगार युवती तसेच युवकांना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील सचिन जिभाऊ सूर्यवंशी या कर्मचाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : बेरोजगार युवती तसेच युवकांना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील सचिन जिभाऊ सूर्यवंशी या कर्मचाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पेठरोड परिसरात राहणाºया प्रमिला नामदेव बागुल या महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदरच्या शिपायाने माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बनावट सह्या केल्या होत्या. त्याचप्रमाणे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून, तो ५८ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.याबाबत माहिती अशी की, पेठरोड दत्तनगर परिसरात राहणाºया सूर्यवंशी हे बागुल यांच्या ओळखीचे असल्याने गेल्या सप्टेंबर २०१६ मध्ये सूर्यवंशी याने, मी महापालिकेत नोकरीला कामाला असून फिर्यादी तसेच तुमचे भाऊ व तुमची बहीण अशा तिघांनाही मनपात लिपिक, इलेक्ट्रीशियन तसेच शिपाई म्हणून कामाला लावून देतो असे सांगून कधी आॅनलाइन कधी रोख अशी जवळपास ८ लाख रुपयांची रोकड उकळली. त्यानंतर काही दिवसांनी बागुल यांना मनपाचे बनावट नियुक्तीपत्र दिले मात्र संशय आल्याने बागुल यांनी याबाबत मनपात खात्री केली असता सदरचे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. सदर कर्मचारी आस्थापना विभागातील असल्याचे स्पष्ट झाले. बागुल यांनी सूर्यवंशी यांची भेट घेऊन वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. नोकरीच्या बहाण्याने तक्रारदार बागुल, त्यांचा भाऊ अमित व बहीण सारिका यांची सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी पंचवटी पोलिसांत धाव घेत झाल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्याने सूर्यवंशी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करीत आहेत.कर्मचा-याची चौकशीमहापालिकेत नोकरीला लावून देण्याच्या नावाखाली ८ लाख रुपयांची फसवणूक करणाºया संशयित मनपा कर्मचारी सचिन सूर्यवंशी याची मनपात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बागुल यांच्यापाठोपाठ सूर्यवंशी याने मनपात आस्थापना विभागात कामाला असल्याचा फायदा घेत परिसरातील अनेकांना नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याची शक्यता वर्तविली जात असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.सूर्यवंशी याला टायपिंगही येईना..महापालिकेत नोकरीच्या नावाने फसवणूक करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेला सूर्यवंशी याच्या बरोबरच अनेक जण असावेत किंवा संबंधितांची साखळी असावी, असा पोलिसांना संशय आहे. सूर्यवंशी याला पोलिसांनी याबाबत विचारणा केल्यानंतर आपल्याबरोबर कोणी नसल्याचा दावा त्याने केला. परंतु किमान नियुक्तीपत्राचे टंकलेखन करण्यासाठी तरी त्याने कोणाची तरी मदत घेतली असण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला टंकलेखन करण्यास सांगितले, परंतु त्याला ते करता आले नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणीतरी साथीदार असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका