शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

परिवार फाउंडेशनमार्फत राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:59 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरिना दिला जातो. या पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देप्रल्हाद डेर्ले, जितेंद्र भावे, माणिक कासार यांचा झाला गौरव

सायखेडा : नाशिक जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या परिवार फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय परिवार भूषण पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले, नाशिक जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, कृषी क्षेत्रात दिला जाणारा मानाचा पुरस्कार हा जिल्ह्यात तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजधुरिना दिला जातो. या पुरस्काराचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले होते, व्यासपीठावर नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण वाजे, मविप्र संचालक सचिन पिंगळे, प्रणव पवार, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक उद्दव निमसे, नाशिक अर्बन बँक चेअरमन शिवाजी तडाखे, प्रभाकर रायते, विष्णूपंत गायखे, शांताराम भागवत उपस्थित होते.वैद्यकीय क्षेत्रात दिला जाणारा परिवार भुषण पुरस्कार गोदाकाठ भागात सलग २३ वर्ष रक्तदान शिबीराचे आयोजन करुन हजारो रुग्णांना जीवनदान देणारे डॉ प्रल्हाद डेर्ले यांना प्रदान करण्यात आला. डॉ. डेर्ले यांनी कोरोना काळात एकही दिवस सेवा बंद केली नाही जवळपास सातशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरे केले, परिसरात दरवर्षी हजारो झाडांचे वाटप करून संगोपन करतात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यात अवयव दानाची चळवळ उभी करुन अनेक कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करतात, रस्त्यावरील भिकारी, वेडे यांना जेवण देणे त्यांना आंघोळ घालून त्यांचे केस कापणे, त्यांच्यावर इलाज करणे असे मानवतावादी कार्य भावे करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात आला, तर कृषी क्षेत्रात राज्यात सेंद्रिय शेतीचा पॅटर्न राबविण्यात अग्रेसर असणारे माणिकराव कासार यांना प्रधान करण्यात आला.यावेळी परिवार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, महाराष्ट्र माझा परिवाराचे अध्यक्ष धोंडीराम रायते, बाजीराव कमानकर, मनोज ठाकरे, राजाराम मुंगसे, सुदाम खालकर, स्वप्नील डुंबरे, सचिन उगले, रुपचंद ढिकले, अशोक डमाळे, दीपक पाटील, शिवाजी हांडोरे, शिवनाथ कापडी, राहुल कोटकर, सौरभ बैरागी, धनंजय राजोळे, अनिल टर्ले, संजय जाधव, संतोष गायधनी, योगेश रायते, सोमनाथ आढाव, निखिल डेर्ले, गणेश वाणी, विक्रम निरगुडे, संतोष वरखडे, शरद कदम, उत्तम देवकर, गोविंद झोमान, वाळू जाधव, विनोद खेलूकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक विकास भागवत यांनी तर सूत्रसंचालन जावेद शेख यांनी केले. 

टॅग्स :talukaतालुकाSocialसामाजिक