शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात ७८ टक्के रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 02:03 IST

नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे.

ठळक मुद्देकोरोना : १ लाख ६ हजार कोरोनामुक्त; मृत्युदर अवघा २.१२ टक्के

नाशिक : नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत सध्या १ लाख ३६ हजार रुग्ण आढळले असले तरी १ लाख ६ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विभागात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७८.२५ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.१२ टक्के इतका आहे.लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या नाशिक विभागात वाढत आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा वेगाने उपाययोजना करीत आहेत.नाशिक जिल्हा हॉटस्पॉटनाशिक विभागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात १ हजार ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये ९७१, धुळे जिल्ह्यात ३२१, नंदुरबार ९६ तर अहमदनगरमध्ये ४३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.विभागात सर्वाधिक ५२ हजार ३२९ रुग्ण आढळले, त्यातील ४० हजार ८६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात ३८ हजार १७१ रुग्ण आढळले असून, त्यातील २७ हजार २११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धुळे जिल्ह्यात ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून, त्यातील ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.नाशिक विभागात ३३ हजार २५७ रुग्ण गृहविलगीकरणात, तर ६ हजार १३८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेत आहेत. नंदुरबारमध्ये चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले असले तरी २ हजार ८३९ रुग्ण बरे झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ३१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यातील २६ हजार १५६ रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या