नाशिक : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत गट क व गट ड मधील तब्बल मंंजूर व कार्यरत पदे धरून एकूण ८८ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या ८८ रिक्त पदांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे ७६ ग्रामसेवकांची आहेतजिल्हा परिषदेत ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची एकूण १३०५ पदे मंजूर असून, त्यापैकी १२१७ पदे कार्यरत आहेत. त्यात विस्तार अधिकाऱ्यांची सरळसेवेची १४ पदे मंजूर असून, ७ पदे कार्यरत तर ७ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे पदोन्नती संवर्गातून ४१ पदे मंजूर असून, त्यातील ३९ पदे भरलेली तर २ पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकाऱ्यांची एकूण ५५ पदे मंजूर असून, त्यातील ४६ विस्तार अधिकारी कार्यरत तर ९ विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सरळसेवेतून ग्रामविकास अधिकाऱ्यांची ५८ पदे मंजूर असून, त्यातील ५६ पदे भरलेली तर २ पदे रिक्त आहेत. त्याशिवाय पदोन्नती संवर्गातील १७३ पदे मंजूर असून, १७२ पदे कार्यरत आहेत तर एक पद रिक्त आहे. म्हणजेच ग्रामविकास अधिकाऱ्यांची २३१ पदे मंजूर असून, त्यातील २२८ पदे कार्यरत तर ३ पदे रिक्त आहेत. सरळसेवेतून ग्रामसेवकांची १०१९ पदे मंजूर असून, त्यातील ९४३ पदे कार्यरत तर ७६ पदे रिक्त आहेत. म्हणजेच ग्रामविकास विभागांतर्गत विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांची एकूण ५५ पदे मंजूर असून, ४६ पदे कार्यरत तर ९ पदे रिक्त आहेत. तसेच ग्रामविकास अधिकारी यांची एकूण २३१ पदे मंजूर तर २२८ पदे कार्यरत आणि तीन पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे ग्रामसेवकांची १०१९ पदे मंजूर असून, ९४३ पदे कार्यरत तर ७६ पदे रिक्त आहेत. एकूण १३०५ पदे मंजूर असून, त्यातील १२१७ पदे भरलेली तर ८८ पदे रिक्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.(प्रतिनिधी)
ंजिल्ह्यात ग्रामसेवकांची ७६ पदे रिक्त
By admin | Updated: June 10, 2014 01:03 IST