शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी

By अझहर शेख | Updated: July 19, 2020 13:40 IST

जम्मु-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले.

ठळक मुद्देहुतात्मा पती केशव यांचे स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धारकेवळ रात्रीचे दोन तास अभ्यास

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.जम्मु-काश्मिरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच यशोदा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या तान्हुल्या ह्यकाव्याह्णचा सांभाळ करण्यावर लक्ष केंद्रीत केले. मुलगी लहान असल्यामुळे त्यांना त्यावेळी शिक्षणाकडे वळता आले नाही; मात्र मागील वर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात आपल्या माहेरी बारावीला ह्यएक्स्टर्नलह्ण म्हणून प्रवेश घेतला. घरी सासरे एकटेच असल्याने व काव्या लहान असल्यामुळे नियमितपणे महाविद्यालयात जाणे शक्य नसल्याचे त्यांनी तेथील प्राचार्यांना पटवून दिले. आई, वडील, सासरे व शिक्षक वर्गाची त्यांना चांगली साथ व पाठिंबा लाभला. यामुळेच बारावीची परिक्षा ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण करता आली, असे यशोदा यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.केवळ रात्रीचे दोन तास अभ्यासवीरपत्नी यशोदा यांनी बारावीला कला शाखेतून प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र त्यांची भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द व हुतात्मा केशव यांचे स्वप्न पुर्ण करण्याची बांधलेली खुणगाठ यामुळे केवळ दररोज रात्री आठ ते दहा असा दोन तास घरी अभ्यास करून त्यांनी ७५ टक्के गुण मिळविले.आयटीआयचा पदविका अभ्यासक्रम लग्नानंतरच पुर्ण केला; मात्र कालंतराने शिक्षण मागे पडले. पती शहीद झाल्यानंतर मी सुध्दा भारतीय सेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे पदवीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे होते. म्हणून दोन तास मात्र अत्यंत चांगल्या पध्दतीने अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली.- यशोदा केशव गोसावी, वीरपत्नी

 

टॅग्स :NashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीर