शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

महापालिकेमार्फत खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत ७४ टक्के मिळकतींची मोजणी झाली असून, त्यात ५७ हजार ८८० नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण कालावधीत शिल्लक २६ टक्के मिळकतींमध्ये काही मिळकती कायमस्वरूपी तर काही तात्पुरत्या स्वरूपात बंद आढळून आल्या असून, अनेकांनी मोजणीसाठी प्रवेश नाकारला होता. या सर्व मिळकतींना नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, परिणामस्वरूपी १५ हजार ३९५ मिळकतधारकांनी मोजणीस प्रतिसाद दिल्याची माहिती कर विभागातून देण्यात आली.

नाशिक : महापालिकेमार्फत खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात आतापर्यंत ७४ टक्के मिळकतींची मोजणी झाली असून, त्यात ५७ हजार ८८० नवीन मिळकती आढळून आल्या आहेत. दरम्यान, सर्वेक्षण कालावधीत शिल्लक २६ टक्के मिळकतींमध्ये काही मिळकती कायमस्वरूपी तर काही तात्पुरत्या स्वरूपात बंद आढळून आल्या असून, अनेकांनी मोजणीसाठी प्रवेश नाकारला होता. या सर्व मिळकतींना नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, परिणामस्वरूपी १५ हजार ३९५ मिळकतधारकांनी मोजणीस प्रतिसाद दिल्याची माहिती कर विभागातून देण्यात आली.  महापालिकेकडून मिळकत सर्वेक्षणाचे काम नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला देण्यात आले आहे. सदर कंपनीने १९ डिसेंबर २०१६ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला प्रारंभ केला. सध्या महापालिकेच्या दप्तरी मोकळ्या व बख्खळ जागांसह ४ लाख २४ हजार मिळकतींची नोंद आहे. त्यात ३ लाख ९४ हजार ७१६ मिळकती या बांधीव स्वरूपातील आहेत.  सदर एजन्सीने २८ आॅगस्ट २०१७ पर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्णकेले असता त्यात ३ लाख ४८ हजार ३५४ मिळकतींची मोजणी झालेली आहे. सुमारे ७४ टक्के मिळकतींचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला असता त्यात २ लाख ९० हजार ४७४ मिळकती या जुन्या व पूर्वीच्याच आहेत तर नवीन ५७ हजार ८८० मिळकतींची भर पडली आहे. उर्वरित २६ टक्के मिळकतींमध्ये अनेक मिळकती या कायमस्वरूपी बंद आढळून आल्या, तर काही तात्पुरत्या स्वरूपात बंद आढळून आल्या. अनेक ठिकाणी सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकांना सोबत ओळखपत्र असूनही प्रवेश नाकारण्यात आला होता.  महापालिकेने अशा मिळकतींची यादी करून त्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. बंद घरांच्या दरवाजांवर नोटिसा बजावल्या जात असून, प्रवेश नाकारलेल्यांनाही इशारावजा नोटिसा दिल्या जात आहेत. परिणामस्वरूप गेल्या दोन महिन्यांत १५ हजार ३९५ मिळकतींची मोजणी होऊ शकली आहे. नोटिसांमुळे सर्वसाधारपणे प्रतिदिन सुमारे ५०० मिळकतधारकांची मोजणी केली जात आहे. त्याला नागरिकांकडूनही आता प्रतिसाद मिळू लागला आहे. दि. २४ आॅक्टोबर अखेर ३ लाख ६३ हजार ७४९ मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.  नवीन आढळून आलेल्या ५८ हजार मिळकतींची पुनर्तपासणी केली जाणार असून, त्यासाठी २५ कर्मचाºयांचे पथक नेमण्यात आले आहे. फेरसर्वेक्षणात खरी माहिती दडवून ठेवल्यास संबंधित मिळकतधारकांकडून सहा वर्षे मागे जाऊन त्यानुसार घरपट्टी आकारणी केली जाणार आहे.जुन्या मिळकतींची पुनर्तपासणीसर्वेक्षणात २ लाख ९० हजार ३७४ जुन्या मिळकती आढळून आल्या आहेत. या मिळकतींची मोजणी करण्यात आलेली आहे. मोजणीत वाढीव बांधकाम, वापरात बदल अथवा भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यानुसार घरपट्टीची आकारणी केली जाणार असून, विनापरवाना वाढीव बांधकामांबाबत नोटिसा बजावून कारवाई केली जाणार आहे. ज्याठिकाणी वापरात बदल असेल तेथे व्यावसायिक दराने आकारणी केली जाणार आहे. सद्यस्थितीत नवीन मिळकतींचे फेरसर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर जुन्या मिळकतींकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती घरपट्टी विभागाकडून देण्यात आली.