शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिलसाठी जिल्ह्यात ७०़२८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:06 IST

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़ २८) मतदानप्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० (७०़२८ टक्के) वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी वकिलांनी लावलेल्या रांगा व केवळ दोन मतदान केंद्रे यामुळे ओरड झाल्यानंतर दुपारी चार मतदान केंद्रे वाढविण्यात आली़ मतदानासाठी सुमारे अडीच तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रारंभी गोंधळ निर्माण झाला होता़ दरम्यान, निवडणुकीत उभ्या असलेल्या काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही यावेळी घडले़

ठळक मुद्देमहाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणूक जिल्ह्यात ३२४० मतदान; एकूण १४ मतदान केंद्रे

नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़ २८) मतदानप्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० (७०़२८ टक्के) वकील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी वकिलांनी लावलेल्या रांगा व केवळ दोन मतदान केंद्रे यामुळे ओरड झाल्यानंतर दुपारी चार मतदान केंद्रे वाढविण्यात आली़ मतदानासाठी सुमारे अडीच तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रारंभी गोंधळ निर्माण झाला होता़ दरम्यान, निवडणुकीत उभ्या असलेल्या काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही यावेळी घडले़  महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल निवडणुक ीच्या मतदानासाठी जिल्हा सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांमध्ये १४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती़ या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १६४ उमेदवारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे़ जिल्हा व सत्र न्यायालयात मतदानासाठी सकाळी ९ वाजेपासून वकील रांगेत उभे होते़ मात्र, ३०९२ मतदारांसाठी आयटी लायब्ररी व सहायक सरकारी वकिलांचे कार्यालय अशी दोनच मतदान केंद्रे असल्याने सुमारे अडीच तास एका मतदानासाठी लागत होते़ याबाबत उमेदवार व वकिलांनी ओरड केल्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मतदान केंद्रांची संख्या चारने वाढविण्यात आली़जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळपासूनच निवडणुकीतील उमेदवार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय मसुदा समितीचे निमंत्रक अ‍ॅड़ जयंत जायभावे, माजी सदस्य अ‍ॅड़ अविनाश भिडे, नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ दिलीप वनारसे, आॅल इंडिया वुमेन लॉयर्स संघटनेच्या माजी अध्यक्ष अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, नाशिक बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ विवेकानंद जगदाळे, अ‍ॅड़ लीलाधर जाधव, अ‍ॅड़ अनिल शालिग्राम हे वकील मतदारांना आपल्याला मतदान करावे यासाठी विनंती करीत होते़, तर मतदारांची नावे व अनुक्रम नंबर शोधण्यासाठी जिल्हा न्यायालयातील नवीन इमारतीत उमेदवारांचे समर्थक मदत करीत होते़महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील एक लाख दहा हजार वकील मतदारांसाठी ३११ न्यायालयांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडली़ या निवडणुकीतून महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे २५ सदस्य निवडले जाणार असून, त्यामधून अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे़ या निवडणुकीच्या प्रचारासाठी अखेरपर्यंत उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेटींबरोबरच सोशल मीडियाचा (व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक) प्रचारासाठी प्रभावीपणे वापर करण्यात आला़ पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या मतदानप्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्हाभरात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मदतनीस अशा ९० जणांची नेमणूक करण्यात आली होती़सुमारे दोन महिन्यांनंतर निकालमहाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत बुधवारी पार पडलेल्या मतदानप्रक्रियेनंतर या सर्व ठिकाणच्या मतपेट्या मुंबई येथील महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या मीटिंग हॉलमध्ये नेण्यात येणार आहेत़ या निवडणुकीची पद्धती ही पसंतीक्रम असल्याने पसंतीनंतर उमेदवारांची मते मोजली जातील़ ही सर्व प्रक्रिया किचकट असल्याने सुमारे दोन महिन्यांनंतर या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे़