शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषदेसाठी ७० टक्के मतदान

By admin | Updated: January 12, 2015 00:29 IST

निवडणूक : उमेदवार समर्थकांमध्ये बाचाबाची; तणावपूर्ण शांतता

देवळाली कॅम्प : छावणी परिषदेच्या जागेसाठी ७० टक्के मतदान झाले असून, सोमवारी (दि. १२) सकाळी आठ वाजता नूतन विद्यामंदिर येथे मतमोजणी होणार आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर येत असल्याने मतदानाचा वेग चांगलाच दिसत होता. त्यामुळे सकाळपासून सर्वच वॉर्डात रांगा दिसत होत्या. वॉर्ड नं १ मध्ये दुपारच्या सुमारास दोघा उमेदवारांच्या समर्थकांमधील वाद पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटला. वॉर्ड दोनमध्ये माजी आमदारांना दुसऱ्या उमेदवाराच्या समर्थकाने धक्काबुक्की करण्याचे वृत्त आहे. यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. वॉर्ड क्रमांक सहामध्ये दोघा उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. वॉर्ड सातमध्ये बाहेर गावातील उमेदवार आल्याने उमेदवारांनी तक्रार करत मतदान करून देण्याच्या भूमिकेमुळे शिंगवे बहुला येथे वातावरण तंग झाले होते. वॉर्ड क्रमांक एकमध्ये ४३६९ पैकी ३०९९ वॉर्ड दोनमध्ये ५२०२ पैकी ३१०५ तीनमध्ये ५१०७ पैकी ३७७७ चारमध्ये ४३३२ पैकी ३४१६ पाचमध्ये ४३२३ पैकी २७४०, सहामध्ये ४३२३ पैकी २९८९, सातमध्ये ५१८३ पैकी ३५२१, तर आठमध्ये ४८५६ पैकी ३७५६ मतदारांनी मतदान केले. देवळाली छावणी परिषदेची निवडणूक प्रथमच पक्षीय चिन्हांवर होत असल्याने पक्षीय पातळीवर या निवडणुकीकडे विशेष लक्ष होेते. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने भाडेतत्त्वावर आणली होते. छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते, यतिन वाघ, अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर आदि नेते उपस्थित होते. मतमोजणी सकाळी ८ वाजता नूतन विद्यामंदिर, भगूर बसस्टॅण्डसमोर होणार आहे. (वार्ताहर)