शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी ७० टक्के यंत्रमाग पूर्वपदावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:07 IST

मालेगाव : लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड पडून असल्याने उद्योजक हतबल झाले आहेत.

मालेगाव : (शफीक शेख ) लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड पडून असल्याने उद्योजक हतबल झाले आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाच्या आदेशामुळे शहरातील यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आले. दहा दिवस काही कारखाने सुरू ठेवले; मात्र भारतातील कापड व्यापाºयांशी असलेला मालेगाव शहरातील यंत्रमाग उद्योजकांचासंपर्क तुटला. ‘ग्रे क्लॉथ’ माल भारतात ज्या भागात जात होता; मार्चनंतर त्या भागात हा माल जाऊ शकला नाही. कारखानदारांकडून स्थानिक कामगारांना मदतीचा हात राज्यात लॉकडाऊनमुळे इतर ठिकाणी देखील बिकट परिस्थिती आहे. त्यात भिवंडी, इचलकरंजी, विटा, सांगली, सोलापूर, नवीमुंबई येथे आजही कठीण परिस्थिती आहे. यंत्रमाग व्यवसाय पूर्व पदावर येण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे.मालेगावात ९५ टक्के कामगार स्थानिक आहेत. लॉकडाऊन काळात यंत्रमाग कारखानदारांनी त्यांना आर्थिक मदत देवून सांभाळले. परिणामी गेल्या चार महिन्यात यंत्रमाग उद्योजकांचे कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.रमजान महिन्यात मुस्लिम बांधव गरीबांना जकात देतात. मदरसे आणि गरीबांना जकात न देता यंत्रमाग कारखानदारांनी आपल्या यंत्रमागावरील गरीब मजुरांना जकातीचे वाटप केले. आपापल्या मजुरांना परिस्थितीनुसार हप्ता किंवा महिन्यातून चांगली आर्थिक मदत केल्याने यंत्रमाग मजुरांचे घर चालू शकले. काही सामाजिक संस्था एनजीओ यांनी धान्य, तांदूळ यांचे कीट वाटले. अतिरिक्त रक्कम कामगारांना दिली. काही नातेवाईकांनी आणि शेजारील लोकांनी मदत केली.दोन महिन्यांपासून पेमेंट नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पाली, बालोतरा, मुंबई येथून पेमेंट येत नव्हते. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे हजारो कोटी रूपयांचे चलन थांबले होते. आजही मुंबई मार्केटमध्ये मालेगावच्या यंत्रमागधारकांचे पैसे अडकले आहेत. पाली आणि बालोतरा येथील काम अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही.

----------------------------मालेगावात प्युवर कॉटन, कॉटन पॉलिस्टर आणि मिक्स पॉलिस्टर या तिन्ही प्रकारचे कापड राजस्थान, गुजरात, नवी मुंबई, कलकत्ता येथे प्रक्रियेसाठी जातो. नऊवारी, सातवारी, बॉर्डरची रंगीत साडी मराठवाडा आणि विदर्भात पाठवली जाते; परंतु त्यांची आजही परिस्थिती खराब आहे.- शब्बीर डेगवाले, यंत्रमाग उद्योजकउत्पादीत केलेला कापड देशातील बाजारपेठेत जावू शकला नाही. जे कापड बाजारपेठेत पाठविले. लॉकडाऊनमुळे रस्त्यातच अडकले. त्यामुळे उद्योजकांचे नुकसान झाले. प्रशासनाने उद्योजकांशी चर्चा करुन अडचणी सोडविल्याने परिस्थिती सुधारत आहेत.- ओमप्रकाश गगराणी, अध्यक्ष व्यापारी, उद्योजक महासंघ

टॅग्स :Nashikनाशिक