शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
3
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
4
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
5
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
6
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
7
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
8
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
9
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
10
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
11
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
13
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
14
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
15
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
16
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
17
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
18
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
19
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
20
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
Daily Top 2Weekly Top 5

नैमित्तिक करारातून बसला ६८ लाखांचे उत्पन्न

By admin | Updated: May 10, 2014 00:03 IST

एसटी : विशेष अभियानातून ४७ लाखांचे उत्पन्न

एसटी : विशेष अभियानातून ४७ लाखांचे उत्पन्ननाशिक : लग्नकार्य आणि सहल यांसारख्या विशेष नैमित्तिक वाहतुकीतून महामंडळाला ६८ लाख एक हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी डिसेंबर ते मार्च महिन्याच्या विशेष मोहिमेत ४७ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते उद्दिष्टाच्या ८० टक्के आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा विविध सहलींसाठी तसेच घरगुती कारणांसाठी नैमित्तिक करार केला जातो. त्यासाठी विविध योजना आणि सवलतींचाही वर्षाव केला जातो. त्यात विविध कारणांसाठी बसेस भाड्याने घेण्याचे प्रमाणही मोठे असते. लग्नकार्यात अणि इतर प्रवासासाठी महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले जाते. त्यात वाढ करण्यासाठी महामंडळाने कमीत कमी अंतरावरसुद्धा बसेस भाड्याने देण्याची योजना आखली. त्यासाठी १ डिसेंबर ते ३१ मार्च या काळात विशेष योजनाही राबविण्यात आली. या काळासाठी ५८ लाख ६५ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ८१ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात वाहतूक विभागाला यश आले. त्यांनी मार्चअखेरपर्यंत वाहतुकीतून ४७ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. यासाठी त्यांनी १४९ करार केले व एक लाख ३२ हजार ७६३ किलोमीटर अंतर कापले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत १४ करारांतून २० लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खासगी वाहतुकीचा अडसरपरिवहन महामंडळ नैमित्तिक करारासाठी सुरक्षित वाहतूक प्रदान करीत असली, तरी वाहतूक करणार्‍या अनेक कंपन्या गाडी उभी ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दरात प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळे महामंडळापेक्षा कमी दरात मिळणार्‍या वाहतूक सेवेला प्रवासीही प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नवाढीला अडसर निर्माण होतो.महामंडळाचा सुरक्षित प्रवासमहामंडळाचा प्रवास हा सुरक्षित असतो. कमीत कमी अंतरासाठीही बस भाड्याने दिली जाते. प्रशिक्षित चालक आणि विम्याने सुरक्षित वाहतूक हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नागरिकांनी नैमित्तिक कारणासाठी महामंडळाच्या बसेसचा वापर करावा, असे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.