शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

६६० मेगावॉट प्रकल्प रखडला

By admin | Updated: November 29, 2015 22:51 IST

इच्छाशक्तीचा अभाव : अनुकूल वातावरण, पाण्याची उपलब्धता असतानाही दिरंगाई

योगेश मानकर,सामनगावमराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना केवळ प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर आतापर्यंत त्याठिकाणी विजेचे आठ संच तयार झालेले आहेत. मात्र पाण्याची उपलब्धता असतानाही नाशिकच्या एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाबाबत शासनाकडून चालढकल सुरू असून, राजकीय इच्छाशक्ती आणि प्राबल्य नसल्याने हा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. पाण्याची समस्या असतानाही भुसावळ येथील बंद केलेला संच क्रमांक दोन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. तर एकलहरे येथे प्रस्तावित असलेल्या ६६० मेगावॉटच्या प्रकल्पाचे घोडे अजूनही अडलेलेच आहे. निर्मितीचे अनेक रेकॉर्ड रचणाऱ्या या वीज केंद्राला फक्त राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने विलंब होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. राज्यात सर्व औष्णिक वीज केंद्रांमध्ये नाशिक औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने २०१५ पर्यंत वीज निर्मितीत सातत्य ठेवत अनेक विक्रम व बचत करीत उद्दिष्ट साध्य करण्यात बाजी मारली आहे. या ठिकाणी ३५ वर्षे जुने वीजनिर्मिती संच आहेत. ते केव्हाही बंद करण्याची सूचना येऊ शकते त्यामुळे ६६० प्रकल्पाला चालना मिळणे अपेक्षित आहे. २०१० पासून मंजुरी मिळालेल्या बदली संचच्या कामाला अद्यापपावेतो सुरुवात होत नाही? पाच वर्ष उलटूनही राजकीय इच्छाशक्ती जागृत का होत नाही? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहे. एकलहरे वीज केंद्राने देशपातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध केलेली असताना येथील संच पुढे नूतनीकरण करून कार्यान्वित ठेवण्यासाठी विचार का केला जात नाही. वीज महाग पडते या एकमेव कारणावरून गेल्या दोन-चार वर्षांपासून या वीज केंद्राला बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. कुठलाही कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी त्याला लागणारे इंधन व पाणी हे चांगले मिळाले तर उत्तम काम करते. येथे उलट परिस्थिती आहे. दूषित पाणी व खराब कोळसा यांच्याद्वारे उचांकी वीजनिर्मिती केली जात आहे. प्रत्येक संचाचे ओव्हरआॅयलिंग दरवर्षी केले जाते ते काम दोन-तीन वर्ष होत नाही तर मग ही निर्मिती महागच पडणार. या बाबींचा विचार होणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाच वर्षांपासून बदली संचाचे काम तसूभरही पुढे सरकले नसल्याने जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्र केवळ शासनाची इच्छाशक्ती नसल्याने थांबले आहे. येथील वातावरण, भौगोलिक परिस्थिती वीज कामगार, अधिकाऱ्यांचे कौशल्य, संचासाठी लागणारी जागा, पाणी, रेल्वे मार्ग सर्व सुविधा उपलब्ध असताना दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शासनाकडून निराशाजनक प्रतिसादभुसावळ येथील बंद केलेले संच तेथील खंबीर लोकप्रतिनिधींमुळे सुरू झाले आहेत, तर येथील उत्तम रीतीने चाललेले संच बंद पाडण्याचे कारस्थान सुरू असून, प्रस्तावित संच रखडलेल्या अवस्थेत आहे. या सार्‍या वेळकाढू धोरणाचा वेगळा अर्थ लावला जात आहे. या प्रकल्पाच्या कामात चिमणीच्या उंचीचा अडसर येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या सोमवारी  ऊर्जा मंत्र्यांच्या दालनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सरपंच शंकर धनवटे, नवृत्ती चाफळकर, विजय जगताप, विशाल संगमनेरे, शेखर आहेर यांच्यात बैठकीदरम्यान चर्चा झाली. मात्र मंत्री महोदयांकडून या प्रकल्पाबद्दल निराशाजनक प्रतिसाद मिळाल्याचे या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.