शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांत अवघे 6500 स्मार्ट लाइट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 01:15 IST

शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक : शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी अडीच महिन्यांत अवघे साडेसहा हजारच दिवे बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उर्वरित साडेनऊ महिन्यांत याच गतीने काम कसे काय होऊ शकेल, असा प्रश्न निर्माण झाला असून, यासंदर्भात स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी माहिती मागवली आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ९२ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. संबंधित कंपनीचे काम दिल्यानंतर अडीच महिने झाले तरी साडेसहा हजार दिवेच बसविण्यात आले आहेत. नगरसेवकांना अत्यंत गतीने काम करण्याची अपेक्षा होती. मात्र त्यानंतरदेखील काम संथगतीने सुरू आहे. दिवे बदलण्यासाठी कंपनीनेच ८० कर्मचारी नियुक्त केले असून, सहा विशेष वाहने दिली आहेत. मात्र, त्यातील वाहन बंद आहेत. एक पथदीप बदलण्यासाठी किमान दोन कर्मचारी लागतात. म्हणजे अवघे चाळीस कर्मचारीच महापालिकेकडे असून त्यांनी अगदी पूर्ण क्षमतेने काम केले तरी अडीचशे दिवेच लागू शकतात. ठेकेदार कंपनीचा उर्वरित कालावधी तपासला तर साडेनऊ महिन्यांत सुमारे ८६ हजार दिवे कसे लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच वेग राहिला तर वेळेत दिवे लागूच शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यातच कंपनीने मध्यंतरी फिटिंग्ज संपल्याचे निमित्त पुढे केले होते. त्यामुळे वेळेत काम होण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे दिवे बदलण्याचे काम एकाच वेळी संपूर्ण प्रभागात न करता एक-दोन लेनमध्ये दिवे बदलण्याचे काम करून नंतर दुसरा भाग शोधला जातो. परिणामी एका भागात तरी पूर्ण दिवे बदलले जात नसल्याने काही ठिकाणी एलईडी तर काही ठिकाणी सोडियम वेपरचे दिवे असा अजब प्रकार होत आहे.एलईडी दिवे बसवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. हे काम वेळेत करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने कर्मचारी संख्या वाढविणे गरजेचे आहे. महापालिकेने कंपनीला सूचना करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.- उद्धव निमसे, सभापती,स्थायी समितीएका भागात काही दिवे एलईडीचे तर काही सोडियम वेपरचे असा अजब प्रकार सुरू आहे. वास्तविक एका संपूर्ण प्रभागात दिवे बसवून मगच दुसऱ्या प्रभागात काम केले पाहिजे.- प्रथमेश गिते, उपमहापौर

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी