शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

निमा निवडणुकीत ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:43 IST

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. २९६५ पैकी १७९२ मतदरांनी मतदानाच हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले. २९६५ पैकी १७९२ मतदरांनी मतदानाच हक्क बजावला. सोमवारी सकाळी मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.  रविवारी सकाळी निमा कार्यालयात मतदानप्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदार रांगेत असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदानप्रक्रि या पार पडली. मतदानासाठी १५ मतदान केंद्र उभारण्यात आले होते. उमेदवारांची संख्या पाहता नावे शोधून देण्यात मतदारांना देण्यासाठी वेळ लागत असल्याने मतदान केंद्राची संख्या वाढवत ही संख्या २८ पर्यंत नेण्यात आली. तत्पूर्वी मतदार रांगेत उभे राहूनही मतदानासाठी वेळ लागल्याने अनेक मतदार मतदान न करताच माघारी फिरले. दुपारपासून साधारणपणे दर तासाला २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  सिन्नरसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. २९६५ मतदारांपैकी १७९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ६०.४० टक्के मतदान झाले. सिन्नरच्या ६५० पैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी दि.३० रोजी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी प्रक्रि येस प्रारंभ होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतांनी, विवेक गोगटे, एन. टी. अहिरे यांनी काम पाहत आहेत.निमाच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनेलमध्ये फूट पडल्याने एकता पॅनल दोन गटांत विभागले गेले आहे. यात निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल, आणि किशोर राठी-आशिष नहार यांचेही एकता पॅनल यांच्या विरोधात उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. निमाच्या इतिहासात प्रथमच तीन पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली.मतदान कक्षात निमाचे माजी अध्यक्ष, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य रेंगाळत असल्याचे पाहून उद्योग विकास पॅनलचे उमेदवार प्रदीप पेशकार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला. ते माजी अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असल्याने तसेच ते मदत करीत असल्याचे निवडणूक अधिकारी व्ही. के. भुतांनी, विवेक गोगटे यांनी सांगून पेशकार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पेशकार ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर निवडणूक अधिकाºयांनी सर्वांना मतदान केंद्रातून बाहेर काढले.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी