गुजरातमध्ये पक्षीघर कल्पना रुजली असून म्हैसणे तालुक्यातील प्रत्येक गावात पक्षीघर आहे. साठ-पासष्ट फुटाचे हे पक्षीघर अत्यंत उंच आहे. जमिनीपासूनचा बेस दहा ते बारा फूट उंच मनोऱ्याप्रमाणे असून त्याच धर्तीवर नाशिकमध्ये पक्षीघर साकारण्यात आले आहे. नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी वेगळेपण हेरून त्यासाठी खास निधीची तरतूद केली आहे. आता बारा फूट बेस तयार करून हे पक्षीघर साकारण्यात आले असून त्यात सुमारे ८०० रेडिमेड घरांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे चार हजार पक्षी या परिसरात दिसू शकतील, असे या प्रभागाचे नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी सांगितले. लोकांच्या मदतीने या पक्षीघराची देखभाल करण्याचीदेखील व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या पक्षीघराचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पुरीया पार्कमध्ये साकारलंय ६० फुटी पक्षीघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST