शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:32 IST

विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी जाहीर केले आहे. शहरातील विविध भागांत यासाठी ८३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याने त्याआधारेच दाखले अदा केले जाणार आहेत.

नाशिक : विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी जाहीर केले आहे. शहरातील विविध भागांत यासाठी ८३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याने त्याआधारेच दाखले अदा केले जाणार आहेत. सेतू कार्यालयाबाबत केल्या जाणाºया तक्रारी, भ्रष्टाचार व पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. दरवर्षी मे ते जुलै या तीन महिन्यांत शासकीय दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत असल्याने त्याचाच गैरफायदा सेतु केंद्राकडून व मध्यस्थ दलांलाकडून उचलला जात असल्याने ते टाळण्यासाठी थेट आपले सरकार या पोर्टलच्या माध्यमातून किंवा नागरी सेवा केंद्रे, महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांनी दाखल्यांसाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. ज्या नागरिकांकडे संगणक व इंटरनेटची सुविधा आहे ते आपल्या घरातूनच अर्ज करू शकतात. या अर्जासोबत आपला भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास त्याच्या माध्यमातून दाखल्याचा प्रवासही कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दाखला तयार झाल्यास त्याची सॉप्ट कॉपी घरात बसून मिळणार आहे. कोणत्याही सायबर कॅफेमधूनदेखील आॅनलाइन अर्ज करता येणार आहे. सेवा हमी कायद्यान्वये जितके दिवस दाखल्यांसाठी निश्चित करण्यात आले त्या वेळेतच दाखले दिले जातील असे सांगून दर दहा हजार लोकसंख्येमागे एक सेवा केंद्र नव्याने सुरू करण्यात येणार असून, आगामी काळात नागरिकांची गरज लक्षात घेऊन नवीन केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.जुने दाखले मिळणारशहरातील सेतू कार्यालयात यापूर्वी शासकीय दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांना त्यांचे दाखले देण्यात येणार आहेत. मात्र यापुढे सेतू कार्यालयात कोणाचेही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे ज्यांचे अर्ज आहेत व दाखले तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहेत, त्यांच्यासाठी काही दिवस सेतू कार्यालय सुरू राहणार आहे. अशा दाखल्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय