शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा तालुक्यात कुल्फी खाल्ल्याने ५५ जणांना विषबाधा

By admin | Updated: March 25, 2017 23:16 IST

नामपूर/द्याने : बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई, महड, बहिराने या गावांत कुल्फी खाल्ल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली

नामपूर/द्याने : बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई, महड, बहिराने या गावांत कुल्फी खाल्ल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून, कुल्फी विक्रेत्यास नामपूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे. विष बाधितांवर नामपूर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी (दि.२४) दुपारी अखिलेशकुमार रामप्रसाद कुमावत हा मटका कुल्फी विक्र ी करत होता. यात नेहमीप्रमाणे चिराई, महड, बहिराने या गावातील लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असा सर्वच वयोगटातील सुमारे ५० ते ६० जणांनी कुल्फी खाल्ली. यात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येण्यास सुरुवात झाली. यात रात्री उशिरा खासगी वाहनाने तत्काळ पुढील उपचारासाठी नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यात साधारणत: सुमारे ५५ रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.एन. एम. भामरे, डॉ. योगेश मोराणे, डॉ. मंडावत यांनी तातडीने उपचार सुरू केले. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे विषबाधित रु ग्णाची प्रकृती ठीक असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, श्रीराम कोळी यांच्यासह नामपूर परिसरातील विविध सामाजिक, राजकीय नेत्यांनी ग्रामीण रुग्णालयात रु ग्णाची विचारपूस केली.  चिराईच्या सरपंच शकुंतला पाटील यांनी कुल्फी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात गर्दी झाली असून, येत्या दोन दिवसात सर्व रुग्णांची तपासणी करून घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. (वार्ताहर)रुग्णालयात प्रत्येक खाटेवर दोन-दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सिंधूबाई लोटन आहिरे (५५), भरत दगा आहिरे (३३), चेतन भरत आहिरे (५), कुसुमबाई दगा आहिरे (४५), सोनाली भरत आहिरे (२२), कल्पना पावला खैरनार (२४), पृथ्वीराज पावला खैरनार (४), नंदिनी जनक निकुंभ (४०), सुनीता भास्कर शिंदे (२२), हर्षदा भास्कर शिंदे (६), निकीता गुलाब आहिरे (१०), मनोहर मधुकर धोंडगे (१०), इशांत विनायक धोंडगे (८), वैष्णवी विनायक धोंडगे (१०), प्रसाद दादाजी धोंडगे (६), मेघश्याम दादाजी धोंडगे (४), गिरीश वाल्मीक धोंडगे (९), भैरव वाल्मीक धोंडगे (६), अमोल शरद सोनवणे (५), गोकुळ शरद सोनवणे (४), नंदिनी दादाजी आहिरे (४), धनश्री दादाजी आहिरे (२), मोहित संजय आहिरे (१३), भावेश किशोर आहिरे (१०), लोकेश किशोर आहिरे (१३), इंद्रजित हरी आहिरे (१३), गजानन विलास आहिरे (१२), रोशनी तुकाराम आहिरे (१३), कल्यानी विजय आहिरे (९), पूजा संजय आहिरे (११), प्रशांत सदाशिव जाधव (१२), सनी सदाशिव जाधव (१०), मंगला सदाशिव जाधव (३०), महेश कौतिक आहिरे (८), सोनाली कौतिक आहिरे (२२), सरला दिलीप आहिरे (१४), नयना दिलीप आहिरे (९), सोनाली दिलीप आहिरे (१२), दीपाली दिलीप आहिरे (१४), माधुरी दिलीप आहिरे (६), अर्चना अशोक आहिरे (१३), सुमन हरिभाऊ बोरसे (४०), वैशाली अशोक आहिरे (१२), लकी युवराज आहिरे (५), सुवर्णा चिंतामण आहिरे (२२) या सर्वांना उपचारासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.