शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये आढळले ५४ डेंग्यू रुग्ण

By admin | Updated: December 29, 2015 23:21 IST

कहर सुरूच : वर्षभरात ४०४ जणांवर उपचार

नाशिक : चालू वर्षी शहरात डेंग्यूच्या लागणची संख्या सुमारे एक हजाराच्या घरात गेली. अर्थात, शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीअंती ४०४ रुग्णांनाच डेंग्यू झाल्याचे आढळले. मात्र, डेंग्यूच्या लागणची ही समस्या अद्याप सुटलेली नाही. चालू महिन्यात ५४ जणांवर उपचार करावे लागले आहेत. साहजिकच स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील मूलभूत आरोग्य सुविधांची असलेली दशा यानिमित्ताने समोर आली आहे.पावसाळ्यापाठोपाठ आजारही येतात त्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यांचे प्रमाण वाढते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर साचलेल्या पाण्यात डेंग्यू पसरविणाऱ्या डासांची निर्मिती होत असल्याचे सांगितले जात असले तरी यंदाच्या वर्षी मात्र डेंग्यूचा मुक्काम वर्षभर असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात १२, फेब्रुवारीत पाच, मार्च महिन्यात एक, एप्रिलमध्ये तीन, मे महिन्यात एक, जून महिन्यात सहा, जुलै महिन्यात २९, आॅगस्ट महिन्यात २४, सप्टेंबर महिन्यात ६७, आॅक्टोबर महिन्यात उच्चांकी १०४ तर नोव्हेंबर महिन्यात ९५ आणि चालू महिन्यात आत्तापर्यंत ५४ रुग्ण आढळून आले. वर्षभराचा विचार केला तर ९१४ संशयित डेंग्यू रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४०४ पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ४८२ निगेटिव्ह आढळले आहेत. २८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. ज्या ४०४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले, त्यातील ३२० रुग्णच महापालिका हद्दीतील असून उर्वरित रुग्ण हे पालिका हद्दीशी संबंधित नसल्याचे पालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते मान्य केले तरी ३२० रुग्ण वर्षभरात आढळले ही संख्या छोटी नाही. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य प्रतिबंधक योजना थिट्या पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा तर वर्षभर पेस्ट कंट्रोलचा ठेका वादात होता. ठेका वादात आणि ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांचा ठेकेदार आणि महापालिकेशी वाद अशी स्थिती होती. त्यामुळे साहजिकच या वादात मात्र नागरिकांचे हाल झाले. अजूनही डेंग्यू पसरत असताना शहरात डास निर्मूलन मोहिमेची ऐशी तैशी झाली होती. त्याचा परिणाम दिसून आला आहे. (प्रतिनिधी)