शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शिक्षक मतदारसंघासाठी ५२ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:21 IST

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत ५२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकरोड : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत ५२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक मतदार संघासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, भाजपासह कॉँग्रेस संलग्न शिक्षक संघटनांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तर काहींनी यापूर्वीच उमेदवारी घोषित केली आहे. निवडणुकीत पुरुष मतदार ३९ हजार ६२४, स्त्री मतदार १२ हजार ५७७ असून, एकूण ५२ हजार २०१ मतदार आहेत. पाचही जिल्ह्याच्या तहसीलदारांना मतदार केंद्र प्रस्तावित करण्यात आले असून, ९४ मतदार केंद्रांवर मतदार प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच जम्बो मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली असून, मतदानासाठी मतपत्रिका राहणार आहेत. मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करणे आवश्यक असल्याची माहिती विभागीय आयुक्त माने यांनी दिली.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीच्या निमित्ताने पाचही जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक अधिसूचना १५ मे रोजी जारी करण्यात येणार आहे. २२ मे पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत असून, २३ मे रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येणार आहे. २५ मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, ८ जूनला सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत मतदानाची मुदत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक