शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५० हजार झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:11 IST

नाशिका- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होणा-यांची संख्येत देखील लक्षणीय वाढ झालो असून मंगळवारी (दि.६) ३३४ रूग्ण बरे झाल्याने ...

ठळक मुद्देदिलासा: चोवीस तासात सात जणांचे मृत्यू

नाशिका- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुक्त होणा-यांची संख्येत देखील लक्षणीय वाढ झालो असून मंगळवारी (दि.६) ३३४ रूग्ण बरे झाल्याने एकुण बरे झालेल्यांची संख्या पन्नास हजारावर गेली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात ५८९ नवे कोरोना बाधीत आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.नाशिक शहरात ६ एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधीत रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्ण संख्या वाढत गेली. जून महिन्यापर्यंत ही संख्या मर्यादीत होती. मात्र नंतर लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आरोग्य नियमांचे पालन नागरीकांनी न केल्याने बाधीतांची संख्या वाढत गेली. गेल्या महिन्यापर्यंत शहरात समुह संसर्ग झाल्याची स्थिती होती आणि रूग्ण संख्या दिवसाकाठी आठशे ते नऊ शे इतकी होती. मृत पावणा-यांची संख्या देखील वाढत गेल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या आठवडाभरापासून रूग्ण संख्या कमी झाली आहे त्यातचदिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. शहरात कोरोना बाधीतांची संख्या ५५ हजार पार झाली आहे. परंतु रूग्ण बरे होणा-यांची संख्या देखील ५० हजाराच्या वर गेली आहे. सध्या उपचार घेणा-यांची संख्या ४ हजार २८५ इतकी आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात कौट घाट येथील ७१ वर्षीय वृध्द महिला, भाभा नगर येथक्षल ६८ वर्षीय रूग्ण, कॉलेजरोडवरील येवलेकर मळा येथील ४५ वर्षीय पुरूष, पंचवटीत उदय नगर येथील ६५ वर्षीय वृध्द, नाशिकरोड येथील कॅनॉल रोडवरील ७० ववर्षीय वृध्द महिला तसेच सातपूर येथील ६४ वर्षीय पुरूण आणि सिडकोतील ७० वर्षीय वृध्द महिलेचा समावेश आहे.रूग्णालयात १ हजार खाटा शिल्लकगेल्या सप्टेंबर महिन्यात शहरात २६ हजार २१ रूग्णांची भर पडली आहे तर २४७ रूग्णांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. शहर वासियांच्या वतीने आॅगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने अत्यंत कठीण होते. मात्र आता दिलासा मिळताना दिसत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रूग्ण संख्या चार हजारावर आहे. तथापि, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी आहे.महापालिकेने शहरात पंधरा पेक्षा अधिक बेड असलेली रूग्णालये कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी घेतली. मात्र, ११८९ पैकी सध्या १ हजार ४४ बेडस शिल्लक आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य