शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

प्रतीक्षा यादीतील ५०० हज यात्रेकरूंना लाभ

By admin | Updated: August 8, 2016 00:56 IST

नोंदणी रद्दमुळे संधी : मुंबईमधून चार हजार, तर नाशिक चे सातशे भाविक होणार रवाना

अझहर शेख नाशिकभारतभरातून बहुतांश यात्रेकरूंची नोंदणी रद्द झाल्याने केंद्रीय हज समितीने राज्यनिहाय मुस्लीम लोकसंख्या आणि प्रतीक्षा यादीचा विचार करत वाढीव टक्केवारी दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र हज समितीच्या प्रतीक्षा यादीमधील ५९७ जुन्या यात्रेकरूंना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून सध्या ७ हजार ३५७ यात्रेकरूंची नावे निश्चित झाली आहेत. महाराष्ट्र हज समितीने काही दिवसांपूर्वी यात्रेकरूंची भाग्यवंत सोडत काढली होती. त्यामध्ये सात हजार ३५७ यात्रेकरूंची नावे जाहीर करण्यात आली होती. यामधून सहाशे यात्रेकरूंनी विविध कारणास्तव नोंदणी रद्द केली आहे; मात्र सदर नोंदणी रद्द झाल्याने कोट्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. भारतभरातील विविध राज्यांमधून जी नोंदणी रद्द झाली त्याचा थेट लाभ केंद्रीय हज समितीने सर्व राज्यांमधील प्रतीक्षा यादीमधील इच्छुकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ५९७ इच्छुकांना संधी मिळाली आहे. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मुस्लिमांची लोकसंख्या ७.२ इतकी आहे. त्यानुसार केंद्रीय हज समितीने राज्याच्या हज समितीला यात्रेकरूंचा कोटा मंजूर केला आहे. राज्यासाठी मूळ कोटा ७ हजार ८४ चा असून, त्यामध्ये २७३ अतिरिक्त कोटा आहे. भाग्यवंत सोडतीमधील ७३५४ पैकी सहाशे यात्रेकरूंनी विविध कारणास्तव राज्यभरातून तिकिटे रद्द केली असून, अशा प्रकारे तिकिटे रद्द होण्याचा प्रसंग प्रत्येक राज्यामध्ये आहे. त्यामुळे भारतभरातून बहुसंख्य हज यात्रेकरूंनी नोंदणी रद्द केली. त्याचा लाभ प्रत्येक राज्याच्या हज समितीला व्हावा, म्हणून लोकसंख्या व प्रतीक्षा यादीचा विचार करता वाढीव जागा वाटप करण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्र हज समितीच्या प्रतीक्षा यादीमधील ५९७ इच्छुक यात्रेकरूंची नावे निश्चित होऊ शकली.सौदी सरकारने जगभरातील विविध देशांना कोटा वाढवून दिला अन् त्यामुळे महाराष्ट्रालाही दीड हजार रिक्त जागा उपलब्ध झाल्या, अशी ंमाहिती विविध माध्यमातून पसरविण्यात येत होती. परंतु ती पूर्णत: अविश्वसनीय असल्याचे राज्याचे हज समितीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी सांगितले. काही खासगी टूर कंपन्यांकडून कोटा वाढविल्याची अफवा व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविली जात असल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे. समितीकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित दोषी खासगी कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.