शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी ५० प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:18 IST

महाराष्ट शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात घोषित केलेल्या धोरणानुसार दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कंपाउंडिंग चार्जेस) लावून ३१ मे २०१८ पर्यंत नियमित करता येणार आहेत.

नाशिक : महाराष्ट शासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात घोषित केलेल्या धोरणानुसार दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कंपाउंडिंग चार्जेस) लावून ३१ मे २०१८ पर्यंत नियमित करता येणार आहेत. त्यासाठी आता महिनाभराचीच मुदत शिल्लक राहिल्याने संबंधित मिळकतधारकांकडून धावपळ सुरू झाली असून, महापालिकेच्या नगररचना विभागाकडे आतापर्यंत दाखल झालेल्या ५० प्रकरणांची छाननी प्रक्रिया पुढील आठवड्यात राबविली जाणार आहे.  महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क वसूल करून प्रशमित संरचना (कंपाउंडिंग स्ट्रक्चर) म्हणून घोषित करण्यासंदर्भात महाराष्ट शासनाच्या नगरविकास विभागाने दि. ७ आॅक्टोबर २०१७ रोजी नियमावली प्रसिद्ध केलेली आहे. शासनाच्या या धोरणानुसार दि. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करता येणार आहेत. मात्र, त्यासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत निश्चित करण्यात आलेली आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या या धोरणात नाशिक शहरातील ‘कपाट’ प्रकरणात अडकलेली अनेक बांधकामे नियमित होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील बांधकाम व्यावसायिकांकडून रितसर कंपाउंडिंग चार्जेस भरून बांधकामे नियमित करण्याची धावपळ सुरू झाली आहे. ३१ मे २०१८ पर्यंत मुदतीत नियमितीकरण न झाल्यास महापालिकेकडून सदर मिळकतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे आतापर्यंत ५० प्रकरणे दाखल झाली असून, त्यांची छाननी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली आहे. दरम्यान, जी अनधिकृत बांधकामे पूर्ण एफएसआय देऊनही नियमित होत नसतील, त्यांना कलम २१० नुसार ०.७५ आणि १.५० मीटर जागा ९ मीटर रस्त्यासाठी सोडून देत बांधकामे नियमित करून घेता येणार आहेत. त्याबाबतही नगररचना विभागाकडे विचारणा सुरू झालेली आहे. शहरात सुमारे ६,५०० मिळकती ‘कपाट’ प्रकरणात अडकलेल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार ३१ मे २०१८ पूर्वी बांधकामे नियमित करून घेण्यासाठी आता फ्लॅट, रो-हाऊस घेणाऱ्या ग्राहकांकडून बांधकाम व्यावसायिकांकडे लकडा सुरू झाला आहे.टीडीआरसाठी प्रतिसादमहापालिकेकडे टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) घेण्यासाठी लागणारी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यानुसार कालबद्ध कार्यक्रमही आखून दिला असून, त्याच्या अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार सहायक संचालक, नगररचना यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. परिणामी, गेल्या काही दिवसांत टीडीआरच्या मोबदल्यात आरक्षित जागा संपादनासाठीची प्रकरणे नगररचना विभागाकडे दाखल होत आहेत. तपोवनातील साधुग्राममधीलही सुमारे नऊ एकर जागा टीडीआरच्या माध्यमातून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका