शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५० एकर शेती पूरपाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:17 IST

कसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देगोदाकाठी कोसळधार : भाजीपाला पिकांना लाखोंचा फटका; द्राक्षबागांमध्ये साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : मुसळधार पावसामुळे आडगाव, सय्यदपिंप्री शिवारातील ओढा-नाल्यांचे पूरपाणी निफाड तालुक्यातील खेरवाडीच्या हनुमाननगर शिवारात जमा होत असल्याने सुमारे पन्नास एकरहून अधिक शेती पूरपाण्याखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.मृग नक्षत्राच्या कोसळधारेमुळे नाशिकच्या आडगाव, सिद्धपिंप्री या पूर्व भागातील ओढे-नाल्यांना दररोज पूर येत असल्याने हे पूरपाणी खेरवाडी, चितेगाव व चांदोरी शिवारात जमा होत आहे. त्यामुळे या शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणी केलेले बियाणे वाहून गेले असून, द्राक्षबागांमध्ये गुडघ्यावर पाणी आहे. ऊस, कोथिंबीर, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जगन्नाथ जाधव, बाळासाहेब संगमनेरे, दत्तात्रय संगमनेरे, माणिक जाधव, रमेश संगमनेरे, निवृत्ती संगमनेरे, लालाजी संगमनेरे, ज्ञानेश्वर संगमनेरे, शांताराम संगमनेरे, विश्वनाथ संगमनेरे, बाळासाहेब संगमनेरे यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची मागणी आडगाव-सय्यदपिंप्री-खेरवाडी-सुकेणे असा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. या रस्त्यावर पिंप्री ते ओणेदरम्यान चार ओहळ असून, ओहळाला पावसाळ्यात पूर येऊन रस्ता बंद होत आहे. या नाल्यावरील फरशी पुलांची उंची वाढवून ओहळांचे खोलीकरण केले तर शेतपिकात पूरपाणी घुसणार नाही, याकडे शासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.पूरपरिस्थितीने शेतकरी हवालदिल गेल्या पाच दिवसांपासून ओढे-नालेलगतच्या शेतात व द्राक्षबागेत पूरपाणी असून, शेतकामे ठप्प झाली आहेत. मुख्य रस्त्यावरून वस्तीवर येणारे रस्ते पाण्यात असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या शिवाराला पूरपाण्याचा तडाखा बसत आहे.नव्याने लागवड केलेल्या कोबी, कोथिंबीर, मेथी, टमाटा, वांगे, भेंडी, गवार, सोयाबीन यांसारखी पिके शेतकºयांच्या हाताबाहेर जात आहे. महागडी बियाणे आणि रोपे खरेदी करून शेतकºयांनी लागवड केली होती; परंतु पूरपाण्याने नुकसान केले असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. मुसळधार पावसामुळे ओढा-नाल्याचे पूरपाणी शेतात साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील ५० एकर अधिक पिके व बागांचे नुकसान झाले आहे.- समाधान संगमनेरे, शेतकरी, खेरवाडी.