शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलमध्ये ४७ टक्के बालके खासगी रुग्णालयातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अर्भकांपैकी साधारणत: ७६१ म्हणजे ४७ टक्के बालके ही खासगी रुग्णालयातील असून, नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते व त्यातील ३० टक्के बालके ही एक किलोपेक्षाही कमी वजनाची असतात, त्यामुळे त्यांच्यात संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.राज्यातील बालमृत्यू, अर्भक मृत्यू, उपजत मृत्यू यांचे प्रमाण आटोक्यात असले तरी, यात आणखी घट कशी होईल याकडे आरोग्य खाते लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. एनआयसीयूमध्ये अर्भकांची विशेष काळजी कशी घेतली जाईल, जंतू संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे तसेच उपजत मृत्यू कसे कमी होतील, याबाबत निओनॅटॅलॉजिस्ट तज्ज्ञांचा समावेश असलेल्या डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात येत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. राज्यातील कार्यरत ३६ एनआयसीयूमध्ये जव्हार, गडचिरोली व नाशिक यांचादेखील समावेश आहे. यात ६०० ते १००० ग्रॅम वजनापर्यंतच्या गुंतागुंतीच्या आजाराने त्रस्त असलेल्या बालकांना बरे करण्यात शासकीय रुग्णालयांना यश प्राप्त झाले आहे. तथापि, यामध्ये अकाली जन्मलेली, कमी वजनाची बालके, रोगशक्ती प्रतिबंध कमी असल्यामुळे अशा अर्भकांना पटकन जंतू संसर्ग होतो. अनेकदा खासगी रुग्णालयातून अशा प्रकारची ‘क्रिटिकल इल’ बालके शेवटच्या क्षणी संदर्भित केली जातात व त्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होते, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बालकांची संख्या ८६५ म्हणजे ५६ टक्के इतकी आहे. विशेष नवजात कक्षात दाखल करण्यात आलेल्या ९० टक्के बालकांचे वजन कमी असते. त्यातील ३० टक्के बालके ही एक किलो वजनाची असतात, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. बºयाचदा गर्भामध्ये अर्भकाकडून मिकोनियम स्त्राव गिळल्यामुुळे आणि तो फुप्फुसात गेल्याने त्याला फुप्फुसाचा संसर्ग होतो त्यामुळे अशा बालकांची श्वसनक्षमता आणि हृदय क्षमता ही बेताचीच असते. बाहेरून संदर्भित केलेल्या अर्भकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.