शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघात  ४६ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:27 IST

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपेक्षा यंदा मतदार संख्या घटली आहे.

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपेक्षा यंदा मतदार संख्या घटली आहे. विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत पुढच्या वर्षी जुलै महिन्यात संपुष्टात येत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम आॅक्टोबर महिन्यातच घोषित केला होता. या निवडणुकीसाठी गेल्या सहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली मतदार यादी रद्द ठरविण्यात आल्याने नवीन मतदारांची नोंदणी करणे अपरिहार्य केल्याने त्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. प्रारंभी या नोंदणीकडे शिक्षकांनी पाठ फिरविली नंतर मात्र निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाºया उमेदवारांनी पुढाकार घेत शिक्षण संस्थाचालकांकडून मतदारांची नोंदणी करून घेतली. ज्यांनी नावे नोंदविली त्यांची प्रारूप मतदार यादी २१ नोव्हेंबर रोजी आयोगाने जाहीर केली असून, या यादीवर हरकती, सूचना मागविण्याबरोबरच २१ डिसेंबरपर्यंत मतदार नोंदणीची मुदत देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यात विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. त्यात नाशिकला सर्वाधिक म्हणजेच १२,३२८ अहमदनगर-११,६१९, धुळे-७४२४ व नंदुरबार ५०३६ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पुरुष शिक्षकांची ३५,५६६, तर महिला मतदारांची संख्या १०७०९ आहे. या मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १० जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुदतवाढ मिळण्याची शक्यता सहा वर्षांपूर्वी या मतदारसंघात नवीन मतदार यादी तयार करण्यात आली असता, विभागातून सुमारे ५३ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यंदा मात्र त्यात सहा हजारांनी घट झाली आहे. साधारणत: जुलै महिन्याच्या पूर्वी या मतदारसंघात मतदान होणार असल्याने तत्पूर्वी आणखी एक टप्पा मतदार नोंदणीचा होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मतदार नोेंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय