शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वेतनश्रेणी अहवालात  ४५ शिक्षकांकडून फेरफार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:42 IST

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ४५ प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणेसाठी गोपनीय अहवालात फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषी आढळलेल्या सर्व ४५ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ४५ प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणेसाठी गोपनीय अहवालात फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषी आढळलेल्या सर्व ४५ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, त्यापूर्वी शिक्षकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी यासाठी त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि.१७) दिले.  जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते. मात्र शिक्षण विभागातील प्राथमिक शाळेतील ४५ शिक्षकांनी सदरची वेतनश्रेणी लागू करण्यासाठी गोपनीय अहवालात परस्पर फेरफार केला. या प्रकरणाच्या चौकशीत संबंधित शिक्षक दोषी आढळले आहेत. गोपनीय अहवालात फेरफार करण्याची बाब गंभीर असल्याने संबंधित शिक्षकांवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा शिस्त व अपील या नियमानुसार एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई होणार आहे. त्यापूर्वी संबंधित शिक्षकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले आहेत.  दरम्यान, एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असताना दुसरीकडे सामान्य प्रशासन विभागातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ५ वरिष्ठ सहायक व ८ कनिष्ठ सहायक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. तसेच २४ वर्ष पूर्ण झालेल्या ५ कनिष्ठ सहायकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.दोन कर्मचा-यांची खाते चौकशीत्र्यंबकेश्वर पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक लिपिक राजेंद्र गांगुर्डे व कविता पवार यांना खाते चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे, कामकाज वेळेवर न करणे, नेमून दिलेल्या कामात कसूर करून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे अशा विविध कारणांमुळे त्यांची खाते चौकशी करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. कविता पवार यांच्यावर परवानगीशिवाय गैरहजर राहण्यासाठीही कारवाई होणार आहे.. पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचाही मुख्य कार्यकारी अधिकारी आढावा घेणार आहेत. पशुधन विकास अधिकाºयांचा त्यांच्या कामाच्या मूल्यांकनानुसार आढावा घेण्यात येणार आहे. कृत्रिम रेतन, लसीकरण यांसह तांत्रिक कामांचा तालुक्याच्या मूल्यांकनानुसार आढावा घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद