शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ४४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:32 IST

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.

नाशिक : वैशाख वणवा सुरू होताच जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली असून, जानेवारीपर्यंत शंभर टक्के जलसाठा असलेल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ४४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षाही सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यमस्वरूपाच्या असलेल्या २४ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठले होते. धरणांची साठवण क्षमता संपुष्टात आल्याने एकाच वेळी जवळपास तेरा धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाचे मुबलक प्रमाण, धरणांतील साठा, नद्या, नाल्यांना आलेला पूर पाहता जमिनीखालील पाण्याच्या पातळीतही जवळपास चार ते पाच फूट पाण्याची पातळी वाढल्याने यंदा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गरज भासणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्वच धरणांमध्ये सरासरी ९९ टक्के जलसाठा कायम होता. त्यानंतर मात्र सिंचनाचे आवर्तन धरणांमधून सोडण्यात आले, त्याचबरोबर धरणांमध्ये विविध कारणांसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण सोडण्यात आले. अशातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले.जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, त्यात आता फक्त २८ हजार ९३७ दशलक्ष घनफूट इतके पाणी शिल्लक राहिले आहे. म्हणजेच धरणांमध्ये ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी दारणा धरणात ७६ टक्के इतके शिल्लक असून, नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा आहे. मालेगावसह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात यंदा ४१ टक्के पाणी असून, ओझरखेड ४८, चणकापूर ३८, हरणबारी ५५, पालखेड ३४ टक्के पाणी शिल्लक आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवनाचा प्रकार पाहता उपलब्ध ४४ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.--------गंगापूर समूहात ४९ टक्के साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात सध्या ४९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण २६ टक्क्यांवर होते. सध्या गंगापूर धरणात ४४, कश्यपीत ८९, गौतमी गोदावरीत ३४ व आळंदीमध्ये ३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरणावर मराठवाडा, नगर जिल्ह्याचे आरक्षण आहे. त्याचबरोबर एचएएल, औद्योगिक वसाहत, एकलहरे वीज निर्मिती केंद्रालाही पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक