शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’साठी जिल्ह्यात ४३३ शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:34 IST

सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर्यंत शाळांना नोंदणीप्रक्रियेत समाविष्ट होणे अपेक्षित असताना बºयाच शाळांची अद्यापही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेशाची प्रकिया पुढे सरकली आहे.

नाशिक : सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर्यंत शाळांना नोंदणीप्रक्रियेत समाविष्ट होणे अपेक्षित असताना बºयाच शाळांची अद्यापही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे २५ टक्के प्रवेशाची प्रकिया पुढे सरकली आहे.  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये किमान २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अशा प्रक्रियेतून शाळेत दाखल होणाºया विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते. त्यामुळे अशा शाळांना या प्रक्रियेत आपल्या शाळेतील २५ टक्के प्रवेश राखून ठेवण्याबाबतची नोंदणी आॅनलाइन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळेंना २० तारखेपर्यंत नोंदणी करून सहमती दाखविणे अनिवार्य होते. परंतु काही शाळांकडून विलंब झाल्याने तसेच काही शाळांकडून कागदपत्रांची पूर्तता होऊ न शकल्याने त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. संबंध राज्यात अशाप्रकारे असंख्य शाळांचे अजूनही नोंदणी बाकी आहे. या शाळांना नोंदणीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून २५ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राहिलेल्या शाळा या २५ तारखेपर्यंत शाळांचा सहभाग नोंदविणार आहेत. नाशिक जिल्ह्यातही शाळा नोंदणीला गती आली आहे. परंतु काही त्रुटींमुळे अनेक शाळांची अद्याप नोंदणी होऊ शकलेली नाही. आत्तापर्यंत सुमारे ४३३ शाळांनी आरटीईसाठी नावनोंदणी केली आहे. मागीलवर्षी ५३७ इतक्या शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केलेली होती. यंदा यातील काही शाळा अनुदानित झाल्याने शाळांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. प्रवेशाच्या तारखेत बदल शक्य आरटीई प्रवेशाबाबतच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार शाळांनी १० ते २० जानेवारी या कालावधीत नोंदणी करणे अपेक्षित होते, तर २२ रोजी शाळांची पडताळणी केली जाणार होती, तर पालक २४ पासून आॅनलाइन प्रवेशासाठी अर्ज करू शकणार होते. परंतु आता शाळांना मुदतवाढ देण्यात आल्यामुळे आॅनलाइन प्रवेशाच्या तारखेतही बदल होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद