शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजार विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:27 IST

महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात येणाºया पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व अजूनही कायम असून, गेल्या १८ तारखेला झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातून सुमारे ४२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील २७७ केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली होती.  शिक्षण परिषदेच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या १८ रोजी घेण्यात आली. इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून २४,७५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तर २४,१२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १५३ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून १९,०५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र १८,५५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला, नाशिक मनपा आणि मालेगाव मनपामध्ये एकूण २७७ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. नाशिक महापालिका हद्दीत पाचवीच्या ३० तर आठवीच्या ५८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. तर मालेगावमध्ये एकूण १३ केंद्रांवर दोन्ही वर्गाची परीक्षा घेण्यात आली. प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बुद्धिमत्ता चाचणी अशा विषयांची ही परीक्षा असून, शिष्यवृत्ती पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० टक्के गुण जिल्हानिहाय मजूर शिष्यवृत्तीच्या संचानुसार पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घोषित केले जाते.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा