शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४२ खेडी पाणीपुरवठा योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 01:51 IST

गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना निधी उपलब्ध वीज वितरण कंपनीने दाखविली संवेदनशीलता

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून थकीत वीजबिल आणि नादुरुस्त केबलमुळे बंद असलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर अखेर गेल्या शुक्रवारपासून सुरू करण्यात आली. या प्रकरणी वीज वितरण कंपनीनेदेखील संवेदनशीलता दाखविल्यामुळे पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यास मदत झाली.जिल्हा परिषदेने जिल्हा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीमधून १३ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच वीज वितरण कंपनीकडून याकामी पुढाकार घेण्यात आल्याने ४२ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत नांदगाव व चांदवड तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिलाची रक्कम वारंवार थकीत राहत असल्याने ही योजना बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून थकीत बिलामुळे या योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ४० गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ही योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही याबाबत चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनीदेखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तत्काळ बैठक आयोजित केली होती. यामध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी व पाणीपुरवठा योजनेशी संबंधित सर्व यंत्रणांना बोलाविण्यात आले होते. डॉ. गिते यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना चालू वीजबिल तसेच मागील थकीत बिलाही रक्कम कमी करून ११ लाख ८० हजार देयक भरून वीज जोडण्याची सूचना वीज वितरण विभागास केली होती. वीज वितरण विभागानेही सकारात्मक भूमिका घेतल्याने शुक्रवारपासून ही योजना पूर्ववत सुरू झाली आहे. नाग्यासाक्या धरणातून सदरचा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीपुरवठा विभागाला सूचना४२ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील देखभाल दुरु स्तीमधून वीज देयक भरण्यासाठी साडेसात लाख, तर देखभाल दुरु स्तीसाठी साडेपाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, वीज वितरण विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने ही योजना सुरू करण्यात यश आले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यात अशाप्रकारे थकीत वीजबिलामुळे कोणतीही योजना बंद पडणार नाही यासाठी पाणीपुरवठा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी