शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

शहरात आढळले डेंग्यूचे ४१ रुग्ण

By admin | Updated: October 18, 2014 00:33 IST

रोगराई : पंधरा दिवसांत आढळले १२४ संशयित रुग्ण

नाशिक : शहरात रोगराई सुरूच असून, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ४१ डेंग्यू रुग्ण आढळले असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पालिकेला अद्याप डेंग्यू रोखण्यात यश आलेले नाही.चालू वर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. चालू महिन्यात म्हणजेच १ ते १६ आॅक्टोबरपर्यंत पालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार एकूण १२४ संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ७७ अहवाल प्राप्त झाले असून, त्यानुसार ४४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्थात, यापैकी ३३ रुग्णच पालिकेच्या हद्दीमधील असून, उर्वरित रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहेत, असे पालिकेचे म्हणणे आहे. गेल्या महिनाभरापर्यंत सुमारे ७० रुग्ण आढळले होते; परंतु राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर नाशिक महापालिकेचा क्रमांक २३ वा आहे. सुमारे अडीचशे रुग्ण असलेली पुणे महापालिका अव्वल असल्याचे सांगण्यात आले होते.महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशी दक्षात घेण्याची गरज असताना ती घेतली नाही. डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि धुरळणीचे काम करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपण्याच्या आधी पालिकेने नूतन ठेकेदार नियुक्त करण्याची गरज असतानादेखील पालिकेने योग्य वेळी प्रक्रिया राबविली नाही. परिणामी, जुन्याच ठेकेदाराला तब्बल सात वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे. (प्रतिनिधी)