शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

दिवाळीत रोज ४०० टन कचरा

By admin | Updated: November 16, 2015 22:48 IST

खतप्रकल्प : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक कचरा

सिडको : दिवाळीनिमित्त शहरात कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, महापालिकेच्या खतप्रकल्पावर गेल्या आठवडाभरात रोज सुमारे ४०० टनहून अधिक कचरा घंटागाड्यांमार्फत वाहून आणला जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. ११) खतप्रकल्पावर ४३९ टन कचरा आणला गेला. दरम्यान, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अजूनही ठिकठिकाणी कचरा पडून आहे.शहरात घंटागाड्यांमार्फत दररोज सुमारे ३२५ ते ३५० टन कचरा खतप्रकल्पावर वाहून आणला जातो. शनिवार, दि. ७ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीही दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरगुती साफसफाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर काढला. दीपोत्सवात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचरा साचला. दि. १० नोव्हेंबरला खतप्रकल्पावर १४९ घंटागाड्यांमार्फत २९२ टन कचरा वाहून आणण्यात आला, तर दि. ११ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यात तब्बल दीडशे टनांनी वाढ होऊन २०२ घंटागाड्यांमार्फत ४३९ टन कचरा संकलित करण्यात आला. दि. १२ नोव्हेंबरला पाडव्याच्या दिवशी १९४ घंटागाड्यांमार्फत ४०१ टन, तर दि. १३ नोव्हेंबरला भाऊबीजच्या दिवशीही ४०१ टन कचरा खतप्रकल्पावर आणला गेला. शहरात अजूनही ठिकठिकाणी कचरा साचलेला असून, घंटागाड्यांमार्फत संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, खतप्रकल्पावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कचरा येत असताना खतप्रकल्प पुरेशा क्षमतेने चालविला जात नसल्याने कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. (वार्ताहर)