नाशिक : शहर वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना पुन्हा लक्ष्य केले असून शालिमार, कॉलेजरोड व पवननगर परिसरात शनिवारी (दि़१२) राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४०० हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, ही मोहीम सुरूच राहणार असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी केले आहे़पोलीस आयुक्त डॉ़ सिंगल यांनी दुचाकीस्वारांचे प्राण वाचविणाºया हेल्मेटची शहरात सक्ती केली़ याची सुरुवातही त्यांनी प्रथम पोलीस अधिकारी व कर्मचाºयांपासून केली़ तसेच सरकारी कार्यालये व पोलीस ठाण्यांमध्ये तर हेल्मेटशिवाय दुचाकीस्वारांना प्रवेशही दिला जात नाही़ मात्र, असे असूनही दुचाकीस्वारांकडून हेल्मेट वापरण्याबाबतची अनास्था कायम असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत़शहरातील शालिमार, कॉलेजरोड, पवननगर या परिसरात वाहतूक शाखेने जोरदार मोहीम राबविली़ सायंकाळपर्यंत हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणाºया सुमारे ४०० हून अधिक दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांनी दिली़
400 दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:13 IST
नाशिक : शहर वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना पुन्हा लक्ष्य केले असून शालिमार, कॉलेजरोड व पवननगर परिसरात शनिवारी (दि़१२) राबविण्यात आलेल्या मोहिमेत ४०० हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे़ दरम्यान, ही मोहीम सुरूच राहणार असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी केले आहे़पोलीस ...
400 दुचाकीस्वारांवर कारवाई
ठळक मुद्देशालिमार, कॉलेजरोड व पवननगर परिसरात मोहीम पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश