शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याणच्या ४० कोटींच्या अडकल्या योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:55 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सन २०१६-१७ च्या दलितवस्ती सुधार योजनेसह २० टक्के सेस व ३ टक्के अपंग निधीच्या योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सप्टेंबर उलटूनही हा निधी प्रत्यक्ष खर्च, तर अप्रत्यक्ष धनादेश वटत नसल्याने खर्च होण्यास तांत्रिक ...

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सन २०१६-१७ च्या दलितवस्ती सुधार योजनेसह २० टक्के सेस व ३ टक्के अपंग निधीच्या योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. यावर्षी सप्टेंबर उलटूनही हा निधी प्रत्यक्ष खर्च, तर अप्रत्यक्ष धनादेश वटत नसल्याने खर्च होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.दरम्यान, या ४० कोटींच्या जिल्हा बॅँकेत अडकलेल्या निधीबाबत समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.जी. सोनकांबळे यांना विचारणा करीत हा निधी तत्काळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.२० टक्के सेस मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या वैयक्तिक योजनांचा निधी, आंतरजातीय विवाह योजना, शालेय शिष्यवृत्ती, अपंग शिष्यवृत्ती, वृद्ध कलावंताचे मानधन, मागासवर्गीय वसतिगृहाचा निधी, अपंगांच्या राज्यस्तरीय योजना या सर्व योजनांचा सुमारे ४० कोटींचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत अडकला आहे. लाभार्थ्यांना दिलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे धनादेश क्लिअर होत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. हा ४० कोटींचा निधी अडकून पडल्याने मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देता आलेला नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. व सर्वच योजनांचे काम रखडले आहे. दलितवस्ती सुधार वस्तीचे सुमारे २८ कोटींची कामे निधीअभावी सुरू करण्यात आलेली नाही. विकासकामे ठप्प झाल्याने आणि लाभार्थ्यांना वेळेत योजनांचा लाभ देता येत नसल्याने सभापती सुनीता चारोस्कर यांनी जिल्हा बॅँकेतील अडकून पडलेला ४० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश लेखा विभागाला दिले.