शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला ३ महिन्यांत ४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:30 IST

पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने ‘बदली प्रयोग’ करत पोलीस ठाणे प्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. या तीन महिन्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे चार अधिकाऱ्यांच्या हाती सोपविली गेली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस धार्जिणे ठरत नसल्याचा सूर ऐकू येत आहे.

ठळक मुद्देआश्चर्यम् : सातत्याने बदली प्रयोग

इंदिरानगर : पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने ‘बदली प्रयोग’ करत पोलीस ठाणे प्रमुखांची खांदेपालट केली जात आहे. या तीन महिन्यांमध्ये पोलीस ठाण्याच्या कारभाराची सूत्रे चार अधिकाऱ्यांच्या हाती सोपविली गेली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस धार्जिणे ठरत नसल्याचा सूर ऐकू येत आहे.इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द जॉगिंग ट्रॅक ते विल्होळी जकात नाक्यापर्यंत आहे. यामध्ये इंदिरानगर राजीवनगर, वडाळागाव, पाथर्डीसह राजीवनगर झोपडपट्टी, कवटेकर वाडी आदी परिसरांचा समावेश होतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, घरफोडी, हाणामारीसह विविध गुन्हे सातत्याने घडत आहेत. या पोलीस ठाण्याला अद्याप जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिळाले ते दीड ते दोन महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकले नाहीत. तीन महिन्यांमध्ये या पोलीस ठाण्याने चार ठाणेप्रमुख बघितले. यामध्ये नारायण न्याहाळदे यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी अनिल पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती, परंतु एका धाब्यावर केलेली दबंगगिरी त्यांना भोवली. अवघ्या दीड महिन्यात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची थेट नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आबा पाटील यांची नेमणूक करण्यात आली, मात्र पंधरवड्यापेक्षा जास्त काळ तेदेखील टिकू शकले नाही. त्यानंतर ठाणे प्रमुखाची सूत्रे कुमार चौधरी यांच्या हातात दिली गेली, मात्र त्यांचीही दीड महिन्यात बदली करण्यात आली.सोमवंशी यांच्यापुढे आव्हानविधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून नियंत्रण कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्याकडे इंदिरानगर पोलीस ठाण्याची सूत्रे दिली गेली. सरकारवाड्यासारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाणे प्रमुखाचा अनुभव पाठीशी असलेल्या सोमवंशी यांच्यापुढे इंदिरानगरमधील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र त्यांना आपली कामगिरी दाखविण्यासाठी किती कालावधी मिळतो, हे लवकरच दिसून येईल.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTransferबदली