शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

येवला तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा वाजला बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:07 IST

येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वारे काढण्यात आल्या आहेत. गावागावांतील राजकीय पक्षाच्या गटप्रमुखांनी वरचष्मा राखण्यासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा चुरशीच्या लढती पहावयास मिळणार आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीचा धुरळा : नेत्यांचा लागणार कस; इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग, तरुणाईचा उत्साह वाढला

पाटोदा : येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वारे काढण्यात आल्या आहेत. गावागावांतील राजकीय पक्षाच्या गटप्रमुखांनी वरचष्मा राखण्यासाठी आतापासूनच वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा चुरशीच्या लढती पहावयास मिळणार आहे.सरपंचपदाची निवड पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून होणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रभागातील लढतींमध्ये चुरस पहावयास मिळणार आहे. गावपातळीवर आपल्याच गटाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गावपुढाऱ्यांनी बेरीज-वजाबाकीचे राजकारण सुरू केले आहे. त्यादृष्टीने व्यूहरचना सुरू झाली आहे.

या ग्रामपंचायतीच्या होणार निवडणुका

उंदीरवाडी, निमगावमढ, नांदूर, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, अंगणगाव, धुळगाव, आडगाव रेपाळ, कानडी, सत्यगाव, नगरसूल, विसापूर पिंपरी, साताळी, बाभूळगाव खुर्द, जळगाव नेऊर, आंबेगाव, वाघाळे, मुखेड, अनकाई, पाटोदा, देशमाने बुद्रुक, अंदरसूल, कोटमगाव खुर्द, राजापूर नेऊरगाव, पुरणगाव, सातारे, एरंडगाव बुद्रुक, मुरमी, पिंपळगाव लेप, महालखेडा, पाटोदा, साोमठाणदेश, ठाणगाव, देवठाण, धामणगाव, कातरणी, विखारणी, सायगाव, खैरगव्हाण, गुजरखेडे, भाटगाव, सावरगाव आदी.येवला महसूल विभागाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात येत असून या 44 ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला राखीव व नागरिकांचा मागास प्रवर्ग निहाय सोडती करण्यात आल्या आहेत.बाशिंगवीरांचा हिरमोडथेट जनतेतून सरपंचाची निवड राज्य सरकाने रद्द केल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची घोर निराशा झाली आहे. तसेच प्रभाग आरक्षणात महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित केल्याने पुरु ष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी सौभाग्यवातीला निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि.७) प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्र मानुसार दावे व हरकती स्वीकारून अंतिम सुनावणी होऊन अंतिम यादी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे.- रोहिदास वारु ळे, तहसीलदार

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायत