शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अडविलेले ३९ परप्रांतीय अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:13 IST

दिंडोरी तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा आधार देत पोटाची खळगी भरण्यास मदत केली.

दिंडोरी (भगवान गायकवाड)  : तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस्थांनी मदतीचा आधार देत पोटाची खळगी भरण्यास मदत केली. प्रशासनाने दिंडोरी व वणी येथे परप्रांतीयांसाठी शेल्टर होम सज्ज ठेवले आहे. दिंडोरीत अद्याप कोणत्याही मजुरांना शेल्टर होमचा आसरा घेण्याची गरज पडलेली नाही. मात्र उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या ३९ परप्रांतीयांना राष्ट्रीय महामार्गावर अडवत त्यांना वणी येथील महाविद्यालयातील निवारागृहात ठेवण्यात आले असून, त्यांना विविध सामाजिक संस्थांनी सर्व गरजू वस्तू पुरवत आधार दिला आहे.लॉकडाउन जाहीर होताच दुसºयाच दिवशी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी दिंडोरी व वणी येथे सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावत लॉकडाउनमुळे ज्या नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे त्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार दिंडोरीत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत अन्नधान्य दान केले. दिंडोरी नगरपंचायतच्या माध्यमातून १४०० लोकांना जीवनावश्यक किराणा साहित्य वाटण्यात आले. ज्या कंपनीत कामगार काम करत होते त्या कंपन्यांनीही त्यांचे ठेकेदारांमार्फत कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली. दिंडोरीतील कापड व्यापारी संघटनेने टॉवेल, बेडशीट, चादर, ब्लॅँकेटची मदत केली तर किराणा व्यापारी असोसिएशनने किराणा साहित्य व अत्यावश्यक किट दिले. शहरातील ९० दिव्यांग बांधवांना किराणा मालाचे किट देण्यात आले.दरम्यान, नाशिक आग्रा महामार्गावरून एक टेम्पोत परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असताना पोलिसांनी त्यांचा टेम्पो जवळके दिंडोरी दहावा मैल परिसरात पकडला व त्यांना दिंडोरीत आरोग्य तपासणी करून वणी येथील महाविद्यालयातील शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले आहे. वणी येथील संख्येश्वर तीर्थ ट्रस्ट व शिवभोजन थाळी यांच्याकडून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी टॉवेल, टूथपेस्ट, ब्लॅँकेट चादर आदींची व्यवस्था केली आहे. सरकारी पातळीवरून कोणतीही मदत नसताना प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार आदींनी नागरिकांच्या मदतीने कोरोनाच्या लढ्यात लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना आधार देत त्यांची सोय केली आहे.--------------------------------पायी जाणाºया मजुरांना जेवणराष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो मजूर आपल्या गावी पायी जात आहे. त्यांना जवळके दिंडोरी येथे तुकाराम जोंधळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून जेवण व पाण्याची व्यवस्था केली असून, अविरपणे ही सेवा सुरू आहे.-----------------------------अनेक मजुरांना गावाची ओढ४काही कंपन्या व बांधकामे चालू झाली आहेत. मात्र कामगारांना मूळगावी जाण्याचे वेध लागले असून, गावी जाण्यासाठी पास मिळावा यासाठी तलाठी कार्यालयात परप्रांतीय गर्दी करताना दिसून येत आहेत------------------------------मुंबईत सर्व काम बंद असल्याने आमचे हाल होत होते म्हणून आम्ही आमच्या गावी पायी चाललो होतो. त्यात एक गाडीला हात दिला. त्यांनी गाडीत घेतले; परंतु पोलिसांनी आम्हाला अडवून वणी येथे आणले. मात्र येथे आमची जेवणाची - राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाचे व जनतेचे आभार मानतो. आता आम्हाला उत्तर प्रदेशाकडे जाणाºया रेल्वेने आमच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करावी.- शिवप्रसाद यादव,परप्रांतीय मजूर

 

टॅग्स :Nashikनाशिक