शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटींतील ३७ लाखांचा अपहार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:04 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकार-देखील उघडकीस येऊ लागले आहेत.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या कर्जवसुलीला काही ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी मात्र या निमित्ताने बॅँकांच्या शाखांमध्ये तसेच विविध कार्यकारी सोसायटींमध्ये गैरप्रकार-देखील उघडकीस येऊ लागले आहेत. सटाण्यामधील वीरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तपासणीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने या संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याला बँक प्रशासनाने पत्र दिले असून, लवकरच या संदर्भात गुन्हा दाखल होण्याची चिन्हे आहेत. बॅँकेच्या या पवित्र्यामुळे वि. का. संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.जिल्हा बँकेची सन २०१८-१९ मध्ये वसुलीस पात्र असलेली रक्कम २३३१ कोटी असून, त्यापैकी १९२१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी बँकेने १ मार्चपासून धडक मोहीम सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकी असलेल्या दिंडोरी तालुक्यातील थकबाकीदार सभासदांची प्राप्त १०१ वसुली प्रमाणपत्राच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कर्जवसुलीकरावी.कर्ज न भरणाऱ्या सभासदांची शेतजमीन जप्त करून तिच्या लिलावाद्वारे वसुली करण्याचाही निर्णय बॅँकेने घेतला आहे. त्यादृष्टीने बँकेने कर्जवसुली मोहिमेंतर्गत जप्त केलेल्या मालमत्तांचे मूल्यांकन निश्चितीनंतर मालमत्तांची लिलाव प्रक्रियादेखील राबविली.  बँक प्रशासनाने वसुलीसाठी विविध कार्यकारी संंस्थांच्या तपासणीसाठी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाने सटाणा तालुक्यातील वीरगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीतील संस्थेच्या व्यवहारांची तपासणी केली. या तपासणी कालावधीत ३७ लाखांचा अपहार झाल्याचे आढळून आले. तपासणी कालावधीत आढळून आलेल्या आर्थिक अनियमिततेस व गैरव्यवहारास संस्था चेअरमन, संचालक मंडळ व संस्था सचिव जबाबदार असल्याने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिफारस असलेला अहवाल बँकेला सादर झाला. या अहवालानुसार बँकेने संस्थेचे संचालक मंडळ व सचिव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधी तक्रार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.११ लाखांची रक्कम जमामनमाड फळबाग व भाजीपाला खरेदी-विक्री संघाकडे ३९ लाख ९१ हजार थकबाकी वसुलीसाठी संस्थेची मालमत्ता विक्री केली. या विक्रीतून ११ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र