शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुयोजित संचालकांना  ३७ कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 01:27 IST

सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांकडून सातपूरमधील २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना प्लॉट खरेदी करून व्यवहार पूर्ण न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्सकडून ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढून एकूण ३७ कोटी ४६ लाख २४ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

नाशिक : सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांकडून सातपूरमधील २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना प्लॉट खरेदी करून व्यवहार पूर्ण न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्सकडून ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढून एकूण ३७ कोटी ४६ लाख २४ हजार ८५० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बॉटल सम्राट प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य संचालक संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल, मुलगा अभिषेक बद्रीप्रसाद जयस्वाल व पत्नी संतोष बद्रीप्रसाद जयस्वाल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, यातील प्रमुख संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे़  सुयोजितचे संचालक अनंत केशव राजेगावकर (रा़ मॉडेल कॉलनी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे सातपूर येथील गट क्रमांक १००/१/२ क, गट नंबर १००/१ + २५ येथे अनुक्रमे मंजूर लेआऊट क्रमांक १७ ते १९ चे १२०० चौरस मीटर आणि ४००० चौरस मीटर क्षेत्र आहे.  संशयित बद्रीप्रसाद जयस्वाल याने १३ मे २०१५ रोजी अनंत राजेगावकर यांच्याशी व्यवहार करून २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना हा प्लॉट खरेदी केला. या प्लॉटचे खरेदीखत तयार करताना त्यामध्ये खरेदीच्या रकमेसाठी आयसीआयसीआय बँकेचे पुढील तारखेचे धनादेश दिले आहे, असे लिहिलेले होते़ मात्र संशयित जयस्वाल यांनी या प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यात एचडीएफसी बँकेत पूर्ण भरला केला, असे बनावट दस्त तयार करून त्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट शिक्का मारला़  यानंतर संशयित जयस्वाल यांनी ही बनावट कागदपत्रे बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीत दाखल करून तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून २६ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या आधारे ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला. बजाज कंपनीने तीन ते चार दिवसांतच कर्ज मंजूर करून रक्कमही अदा केली़ विशेष म्हणजे बजाज फायनान्सकडून कर्ज मंजूर करताना यातील सर्च रिपोर्टदेखील चुकीचा असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, २०१२ मध्ये बॉटल सम्राट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बद्रीप्रसाद जयस्वाल यांनी सुरू केली होती, मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले असून त्यांचा मुलगा अभिषेक व पत्नी संतोष या कंपनीच्या संचालक असल्याने त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित बद्रीप्रसाद यांनी कोट्यवधी रुपयांचा प्लॉटचा व्यवहार करून फसवणूक केल्याची फिर्याद राजेगावकर यांनी दिली आहे़ बद्रीप्रसाद यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कंपनीचे मालक वारसा हक्काने त्यांची मुले व पत्नी असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़- व्ही़ ए़ शेळके, सहायक पोलीस निरीक्षक, सरकारवाडा पोलीस ठाणे

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस